महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भिगवण रोड नूतन शाखेचे उद्घाटन

बारामती, दि. 8 : बारामती येथील भिगवण रोडवरील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भिगवण रोड नूतन शाखेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.उद्घाटन प्रसंगी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, संचालक मदनराव देवकाते तसेच संचालक मंडळ आणि विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Most Popular

To Top