महाराष्ट्र

पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे महिला कला महोत्सव २०२० चे आयोजन

मुंबई, दि. 9 : पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे ‘महिला कला महोत्सव 2020’ चे आयोजन दि. 12 मार्च 2020 पर्यंत पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई येथे करण्यात आले आहे.

बुधवार, दि. 11 मार्च 2020 रोजी दुपारी 2.00 वा. – प्रकृती रंग, कलाकार पं.अनुरत्न राय व सहकारी (शास्रीय गायन), दुपारी 4.00 वा. – ‘ती’ ची रोजनिशी अभिवाचन, सादरकर्ते सृजन रंग, सायं 6.00 वा. – अभंगवाणी, सादरकर्ते संकल्प कलामंच

रात्रौ 6.30 वा. – सुश्राव्य भजन, सादरकर्ते स्वरश्री महिला भजन मंडळ, सोलापूर, रात्रौ 8.00 वा – ऐश्वर्या ब्युटी पार्लर (मराठी नाटक), कलाकार – वर्षा दांदळे, शर्वाणी पिल्लाई, शुभा गोडबोले, दीपा सावरगावकर, उर्मिला झगडे, पूर्वा कोडोलीकर, विशाल राऊत, प्रमोद फडतरे.

गुरुवार, दि. 12 मार्च 2020 रोजी दुपारी 12.00 वा.  साजरंग (भारतीय स्रीचा पोषाख आणि परंपरा यावर आधारित कार्यक्रम), सादरकर्ते, नवरी सजली, विलेपार्ले, दुपारी 3.00 वा.- ‘असंच होतं ना तुलाही’ (कविता वाचन व गायनाचा कार्यक्रम) सादरकर्ते -मिलिंद जोशी, मनीषा जोशी आणि मुक्ता बर्वे,  सायं 5.00 वा. – रानजाई (लोकसाहित्याच्या संकलक व संपादक डॉ.सरोजिनी बाबर यांच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा संगीतमय कार्यक्रम) सादरकर्ते, डॉ.वंदना बोकिल व सहकारी, रात्रौ 7.00 वा. – समारोप, रात्रौ 8.00 वा. – ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला (मराठी नाटक) कलाकार – वंदना गुप्ते, प्रतिक्षा लोणकर, दीप्ती लेले, राजन जोशी, अथर्व नाक्ती, हास्यवती (महिला विषयक व्यंगचित्र प्रदर्शन) सकाळी 11 ते रात्रौ 8 वाजेपर्यंत, स्थळ : कला दालन. या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या सर्व कार्यक्रमांसाठी प्रवेश विनामूल्य असल्याचे अकादमीचे प्रकल्प संचालक यांनी कळविले आहे.

Most Popular

To Top