महाराष्ट्र

होळी, रंगोत्सवानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई, दि. 9 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला होळी तसेच रंगोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

देशाच्या कानाकोपऱ्यात आपल्या वैशिष्ट्यांसह साजरा होत असलेल्या रंगांच्या या सणाच्या माध्यमातून परस्परांमध्ये स्नेह, मैत्री व बंधुभाव वृद्धिंगत होतो व त्यातून राष्ट्रीय ऐक्यभावना दृढ होते. या आनंददायी सणानिमित्त मी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

Most Popular

To Top