महाराष्ट्र

ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांच्या निधनानं व्यासंगी व्यक्तिमत्व पडद्याआड – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. 9 :- ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक अनंत दीक्षित यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रातील व्यासंगी, ध्येयनिष्ठ व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे, अशा शब्दात त्यांनी अनंत दीक्षित यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, अनंत दीक्षित हे विचारांनी परखड व अनेक पत्रकारांचे आदर्श होते. पत्रकारांच्या अनेक पिढ्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाल्या. कोल्हापूर आणि पुण्याशी त्यांचे जिव्हाळ्याचं नाते होते. त्यांच्या संस्कारातून घडलेले पत्रकार यापुढच्या काळात त्यांचे विचार पुढे नेतील, असा मला विश्वास आहे.

Most Popular

To Top