महाराष्ट्र

अर्थसंकल्पीय अधिवेशन शनिवारपर्यंत – संसदीय कार्यमंत्री ॲड.अनिल परब

मुंबई, दि. 12 : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज शनिवार दि.14 मार्चपर्यंत चालेल. यात अर्थसंकल्पावरील चर्चा, विरोधी पक्षाचा प्रस्ताव, अर्थसंकल्पीय मागण्यांवर चर्चा व मतदान, विनियोजन विधेयक आणि शासकीय कामकाज होईल, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री ॲड.अनिल परब यांनी विधानसभेत तसेच विधानपरिषदेत एका निवेदनाद्वारे दिली.

ॲड.परब म्हणाले, विधानसभा व विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत समितीने विचारविनिमय करुन गुरुवार दि.12 ते शनिवार दि.14 मार्च 2020 पर्यंतचे सभागृहाचे कामकाज ठरविण्यात आले. 

Most Popular

To Top