महाराष्ट्र

‘मी अत्रे बोलतोय’च्या दुसऱ्या आवृत्तीचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, दि. 13 : एकपात्री सादरीकरण ही कला हळूहळू लुप्त होत चालली आहे. ही कला सादर करणारे नवनवे कलाकार तयार झाले पाहिजेत. मी अत्रे बोलतोयया एकपात्री नाट्यप्रयोगाद्वारे दिवंगत कलाकार सदानंद जोशी यांनी आचार्य अत्रे यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहचविले. पुस्तकरूपाने मी अत्रे बोलतोयवाचकांसमोर येत असताना सदानंद जोशी यांची एकपात्री सादरीकरणाची कलादेखील जगविण्याची गरज आहे व त्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

सदानंद जोशी यांच्या मी अत्रे बोलतोयची नाट्यसंहिता व एकपात्रीचा इतिहास थोडक्यात सांगणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज राजभवन येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.

संत ज्ञानेश्वर, समर्थ रामदास, संत तुलसीदास हे संत आपल्या लोकोत्तर ग्रंथांच्या माध्यमातून अमर झाले, तसेच आचार्य अत्रे, सदानंद जोशी आपल्या प्रतिभासंपन्न कार्यामुळे व कलेमुळे लोकमान्य झाले. सदानंद जोशी यांच्याप्रमाणे एकल सादरीकरणाची कला अवगत असलेले अनेक कलाकार समाजात आहेत, परंतु त्यांच्या प्रतिभेला वाव मिळत नाही. असे कलाकार समाजापुढे आणणे ही आचार्य अत्रे व सदानंद जोशी यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले.  

सदानंद जोशी यांच्या स्नुषा तसेच दूरदर्शनच्या वृत्त निवेदिका शिवानी जोशी यांनी संपादित केलेल्या आणि व्यास प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला आमदार आशिष शेलार, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक रविंद्र साठे, काव्यप्रेमी-सादरकर्ते विसुभाऊ बापट, दूरदर्शनचे वृत्तनिवेदक सादरकर्ते शैलेश पेठे आदी मान्यवर उपस्थित होते. व्यास क्रिएशनचे निलेश गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.

००००

Governor Koshyari releases second edition of ‘Mee Atrey Boltoy’

       Mumbai, 13th March : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari released the second edition of the book ‘Mee Atrey Boltoy’ at Raj Bhavan, Mumbai on Friday (13th March).

       MLA Ashish Shelar, Director General of Rambhau Mhalgi Prabodhini Ravindra Sathe, poetry presenter Visubhau Bapat, Nilesh Gaikwad of Vyas Creation and others were present.

The book consists of the script of the popular mono act play by the same name written and presented by well-known artist late Sadanand Joshi.  It has been edited by Doordarshan News presenter Shivani Joshi and published by Vyas Creation.

००००

Most Popular

To Top