महाराष्ट्र

दिशा कायद्यासाठी आवश्यकता वाटल्यास अध्यादेश काढणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 13 : महिलांच्या सुरक्षेसंदर्भातील दिशा कायदा तयार करताना यातून पळवाटा शोधता येऊ नयेत यासाठी सर्वंकष असा कायदा तयार करयासाठी अभ्यास सुरु आहे.  कायदा याच अधिवेशनात करणे प्रस्तावित होते. मात्र अचानक उद्‍भवलेल्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाचे कामकाजाचे दिवस कमी झाल्याने हा कायदा या अधिवेशनात होऊ शकत नाही असे लक्षात आले आहे. तरी,आवश्यकता वाटल्यास या संदर्भात अध्यादेश काढू, असे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत सांगितले. सदस्य विनायक मेटे यांनी औचित्याद्वारे विधानपरिषदेत  उपस्थित केलेल्या मुद्द्यावर त्यांनी निवेदन केले.

००००

अर्चना शंभरकर/विसंअ/13.3.2020

Most Popular

To Top