महाराष्ट्र

‘लोकराज्य’चा महिला विशेषांक प्रकाशित


मुंबई, दि. 16 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या लोकराज्यचा मार्च महिन्याचा अंक महिला विशेषांक म्हणून प्रकाशित करण्यात आला आहे. या अंकाच्या अतिथी संपादक महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर (सोनावणे) या आहेत.

जागतिक महिला दिनाच्या औचित्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या या विशेषांकात विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेल्या महिलांच्या यशोगाथा, महिला विकासासाठी शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध योजना व उपक्रमांची माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर महिलांसाठीचे महत्त्वपूर्ण कायदे, दिल्लीतील महाराष्ट्रीय कर्तृत्त्ववान महिला, बचतीच्या संधी, महिलांचे आरोग्य, इंटरनेट व सोशल मीडियाचा वापर करताना घ्यावयाची खबरदारी याबाबतच्या लेखांचा यात समावेश करण्यात आला आहे. शिवाय प्रेरणा, गडकिल्ले या माहितीपूर्ण सदरांसोबतच शासकीय घडामोडींच्या माहितीचाही या अंकात समावेश आहे. अंकाची किंमत 10 रुपये असून हा अंक सर्वत्र उपलब्ध आहे.

0000

Most Popular

To Top