महाराष्ट्र

नागपूर एम्स मध्ये बाह्यरूग्ण सेवेस सुरुवात

नवी दिल्ली, दि. 17 : नागपूर येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसेस (एम्स) मध्ये बाह्य रुग्ण सेवेस सुरुवात झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात दिली.



केंद्र शासनाने 7 टप्प्यांमध्ये देशभरात एकूण 22 एम्स संस्था उभारण्याचा निर्णय घेतला. यापैकी देशभरात आतापर्यंत भोपाळ (मध्यप्रदेश), भूबनेश्वर (ओडिशा), जोधपूर (राजस्थान), पटना (बिहार), रायपूर (छत्तीसगड) आणि ऋषिकेश (उत्तराखंड) ही 6 एम्स कार्यरत  झाली आहेत.

देशात महाराष्ट्रातील नागपूर येथील एम्ससह उत्तर प्रदेशात रायबरेली आणि गोरखपूर, आंध्रप्रदेशातील मंगलागिरी आणि पंजाबमधील भटिंडा एम्स येथील बाह्यरूग्ण सेवेस सुरुवात झाली आहे.                      
000000 

रितेश भुयार /वृत्त वि. क्र.57/१७.०३.२०२०

Most Popular

To Top