महाराष्ट्र

नायडू रुग्‍णालयातील डॉक्‍टर आणि परिचारिकांचे आरोग्‍य मंत्री राजेश टोपे यांनी मानले आभार

पुणे, दि. 18 : सार्वजनिक आरोग्‍य व कुटुंब कल्‍याण मंत्री राजेश टोपे यांनी पुणे महापालिकेच्‍या डॉ.नायडू रुग्‍णालयाला भेट देऊन पाहणी केली.

यावेळी जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सुनील टिंगरे, पुणे महापालिकेच्‍या अतिरिक्‍त आयुक्‍त रुबल अग्रवाल, आरोग्‍य प्रमुख रामचंद्र हंकारे, वैद्यकीय अधीक्षक सुधीर पाठसुते यांच्‍यासह इतर वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. श्री. टोपे यांनी रुग्‍णालयातील रुग्णांची सद्यस्थिती जाणून घेतली. त्‍यांना आवश्‍यक  त्‍या सोयी सुविधा देण्‍याबाबत सूचना केल्‍या.


रुग्‍णालयातील डॉक्टर आणि परिचारिका उत्‍तम सेवा देत असल्‍याबद्दल श्री.टोपे यांनी त्‍यांचे आभार मानले.

००००

Most Popular

To Top