महाराष्ट्र

अनावश्यक दंतवैद्यकीय सेवा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे भारतीय दंत संघटनेचे अध्यक्ष डॉ.रविंद्र सिंह यांचे आवाहन


मुंबई, दि. 19 : देशात उद्भवलेल्या कोरोना (कोवीड –१९) या विषाणुच्या प्रसारावर आळा बसावा यासाठी दंतवैद्य क्षेत्रातील डॉक्टरांनी अनावश्यक व तातडीच्या नसलेल्या दंत सेवा ३१ मार्च २०२० पर्यंत बंदठेवाव्यात. त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीत सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना भारतीय दंत संघटने (इंडियन डेंटल असोसिएशन) चे अध्यक्ष डॉ. रविंद्र सिंह यांनी दंतवैद्य चिकित्सकांना दिल्या आहेत.
इंडियन डेंटल असोसिएशन (आय डी ए) या दंतवैद्य क्षेत्रातील डॉक्टरांसाठी काम करणाऱ्या संघटनेने सध्या कोरोना वायरस (कोविड-१९) च्या पार्श्वभूमीवर देशात  उद्भवलेल्या विलक्षण परिस्थितीवर चिंता व्यक्त करत या विषाणुचा प्रसार अधिक होऊ नये यासाठी अनावश्यक व तातडीच्या नसलेल्या दंत सेवा 31 मार्च 2020 पर्यंत  स्वेच्छेने बंद ठेवण्याचे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.      

संघटनेचे अध्यक्ष डॉ.रविंद्र सिंह यानी दंत वैद्य चिकित्सकांनी स्वत:ची पूर्ण काळजी घ्यावी आणि आपत्कालीन सेवा देताना या आजाराच्या प्रसारावर लक्ष ठेवावे असे नमूद केले आहे. संघटनेचे सरचिटणीस डॉ.अशोक ढोबळे यांनी दंतवैद्य चिकित्सकांना सतर्क राहून आपल्याकडे आलेल्या रुग्णांच्या श्वासाच्या आजारांबाबतीत काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. आय. डी. ए. संघटना सर्व दंत वैद्य चिकित्सकांना अद्ययावत माहिती देण्यासाठी व त्यांना वेळोवेळी उपयुक्त मार्गदर्शन करण्यासाठी कटिबद्ध आहे. संघटना सर्व दंत वैद्य चिकित्सकांना अद्ययावत माहितीबाबत सतर्क करेल, असेही या प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.

००००

Most Popular

To Top