मुंबई, दि. 23 : कोरोनाविरोधातील लढाईसाठीराज्य शासन सज्ज असूनकोरोनाच्या तपासणी तथा उपचारासाठीआवश्यक त्या सर्व उपाययोजनातातडीने करण्यात येतील, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्री अमितदेशमुख यांनी आज येथेदिली. भायखळायेथील जे.जे. रुग्णालयात निर्माण करण्यातआलेल्या चाचणी केंद्र आणिकोरोनाबाधित रूग्णांसाठी तयारकरण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाची पाहणी मंत्रीश्री. देशमुखयांनी केली, त्यावेळी ते बोलतहोते. सामाजिक अंतर सर्वांनी पाळण्याबाबतचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी श्री. देशमुख म्हणाले, कोरोनाविरोधातील ही लढाई जिंकण्यासाठीडॉक्टर, आरोग्य कर्मचारी सज्जअसून त्यांना आवश्यक सर्वमदत शासन देईल. मुख्यमंत्री उद्धवठाकरे, उपमुख्यमंत्री अजितपवार, आरोग्यमंत्री राजेशटोपे आणि महसूलमंत्री बाळासाहेबथोरात यांच्यासह संपूर्ण शासनव्यवस्थाखंबीर आहे. शासनाने वेळोवेळी दिलेल्यासूचनांचे पालन सर्वांनी करणेआवश्यक आहे.
भायखळा येथील जे.जे. रुग्णालयात कोरोना अर्थात कोविड–19या विषाणूचे चाचणी केंद्र विक्रमी वेळेत उभे करण्यात आले आहे. यासाठीआवश्यक सर्व यंत्रसामग्री बसविण्यातआली आहे. त्याची दिवसाला 150चाचण्या घेण्याची क्षमता आहे. ही क्षमता 1000पर्यंत वाढविता येते. या चाचणीकेंद्रासोबतच कोरोनाबाधितांसाठी 70खाटांचा विलगीकरण कक्ष आणि10 खाटांचे अतिदक्षता केंद्रसुरू करण्याची तयारी पूर्णकरण्यात आली असून त्याचीपाहणी श्री. देशमुख यांनी केली.
