महाराष्ट्र

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उद्योगांनी शासनास सहकार्य करावे – उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे आवाहन


उद्योगांसाठी दीर्घकालीन हिताचे धोरण आखण्यास शासन कटिबद्ध
मुंबई दि, 24 – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील उद्योग क्षेत्रासमोर उभ्या ठाकलेल्या संकटाची राज्य शासनाला जाणीव आहे. उद्योग विश्वाला आधार देण्यासाठी आपण व्यापक उपाययोजनांचा आराखडा तयार करीत आहोतच. मात्र सध्याच्या बिकट परिस्थितीत उद्योगांनी राज्य शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले आहे.

राज्य शासनाने अत्यावश्यक बाब म्हणून आरोग्य क्षेत्राशी निगडीत काही उद्योगांना सवलती दिल्या आहेत. पंरतु इतर उद्योगांनी सध्याच्या या सवलती मागू नये, असे आवाहनही श्री. देसाई यांनी केले आहे.

कोरोना विषाणूचा  प्रादुर्भाव वाढू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शासनाने सोमवार दि. २३ पासून राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीच्या काळात विविध कंपन्या, आस्थापनांवर देखील बंदी घातलेली आहे. परंतु अत्यावश्यक वस्तुनिर्मितीसह माहिती तंत्रज्ञान व अनुषांगिक सेवा, कृषी व अन्न प्रक्रिया आधारित उद्योग, डाळ व राईस मिल, डेअरी उद्योग, खाद्य व पशुखाद्य उद्योग यांना मात्र सवलत दिलेली आहे. मात्र, इतर उद्योगांनी अनावश्यक परवानगी मागू नये, असे आवाहन श्री. देसाई यांनी केले आहे.

एक आवाहन…

सध्या सार्वजनिक आरोग्य विभागाला आरोग्य विषयक वस्तूंची आवश्यकता आहे. या वस्तूंची  निर्मिती करणाऱ्या उत्पादकांनी सॅनिटायझर, मास्क ,व्हेंटिलेटर्स, नेब्युलायझर्स यासह इतर आवश्यक वस्तूंचा शासनास पुरवठा करावा. यासाठी ही उत्पादन बणविणाऱ्या उद्योजकांनी, अन्न व औषध प्रशासनाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी (psec.mededu@maharashtra.gov.in)

मराठी भाषा सचिव प्राजक्ता लवंगारे  (sec.marathi@maharashtra.gov.in)यांच्याशी संपर्क करावा.

यासोबत खाद्य उद्योग, रसायने, पाणी, वैद्यकीय उपकरणे, कृषी माल बणविणाऱ्या उद्योगांनीदेखील शासनास सहकार्य करावे, असे आवाहन श्री. देसाई यांनी केले आहे.

शासनाने आयकर परतावा दाखल करण्याची मुदत वाढवून दिलेली आलेली आहे. तसेच आर्थिक नियमांना मुदतवाढ दिलेली आहे. पुढे देखील याबाबत त्रास होणार नाही. शासन आपल्या पाठीशी उभे आहे.

उद्योग संबंधी समस्यांसाठी समन्वयक

 उद्योगासंबधी काही समस्या असल्यास या संदर्भात   संपर्क साधण्यासाठी समन्वयक म्हणून याशिवाय  उद्योग विभागाचे सचिव वेणुगोपाल रेड्डी (psec.industry@maharashtra.gov.in),

 उद्योग विभागाचे विकास आयुक्त हर्षदीप कांबळे (didci@maharashtra.gov.in),

एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन (ceo@maharashtra.gov.in),

त्याच बरोबर मंत्रालयात सुरु करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षातील समन्वयक प्रधान सचिव भूषण गगराणी (ccrmaharashtra.aid@maharashtra.gov.in)

यांच्याशी इमेलद्वारे  संपर्क साधावा. असेही श्री. देसाई यांनी सांगितले आहे.

000

अर्चना शंभरकर/ विसअ/ २४-३-२०/उद्योगमंत्री निवेदन

Most Popular

To Top