महाराष्ट्र

अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरविणाऱ्या दुकाने आणि आस्थापनांना निर्बंधातून सूट


मुंबई, दि. 24 : कोविड 19 (रोनाविषाणू) याचा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून विविधकायद्यांतर्गत उपलब्ध असलेल्या अधिकारांचाउपयोग करून संपूर्ण महाराष्ट्रातयेत्या 31 मार्चपर्यंत बंदीआदेश लागू करण्याची अधिसूचनाशासनामार्फत जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार अत्यावश्यकवस्तू सेवा पुरविणाऱ्यादुकाने आणि आस्थापना यांनापुढील निर्बंधातूनसूट देण्यात आली आहे.

1.  किमान मनुष्यबळासह शासकीय लेखा व कोषागरे आणि संबंधित कार्यालये, वाणिज्य दूतावास आणि परकीय संस्थांची कार्यालये

2.किमान मनुष्यबळासह बॅंका/ एटीएम, भारतीय रिझर्व्ह बँक, फिन्टेक सेवा (स्टॉक एक्सचेंज, क्लीअरींग ऑपरेशन्स, म्युच्अल फंडस, स्टॉक ब्रोकर्स) अन्य संबंधितसेवा, विमा, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, कॅश लॉजिस्टिक आणि  कॅश ट्रान्झॅक्शन कंपन्या

3.मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिकमाध्यमे

4.                   टेलिकॉम, टपाल, इंटरनेट, डेटासेवा यांसह माहिती तंत्रज्ञानआणि माहिती तंत्रज्ञान सेवा.

5.त्यावश्यकवस्तूंची पुरवठा साखळी आणिवाहतूक

6.       शेतमाल आणिअन्य वस्तूंची निर्यात आणिआयात

7.                    बंदरे आणि त्यावरुन होणारी वाहतूक, मनुष्यबळ,कंटेनर फ्राईट स्टेशनचे कार्यान्वयन,साठवणूक, कस्टम हाऊस एक्सचेंजची कार्यालये, रेल्वेच्या अत्यावश्यक सेवा

8.खाद्यपदार्थ, औषधे आणि वैद्यकीयउपकरणे यांसह त्यावश्यक वस्तूंचेकॉमर्सद्वारे वितरण

9.खाद्य पदार्थ, किराणा, दूध, ब्रेड, फळे, भाजीपाला, अंडी, मांस, मासे यांचीविक्री, वाहतूक आणि साठवण

10.                बेकरी आणि पाळीवप्राण्यांसाठीचे खाद्यपदार्थ आणिपशुवैद्यकीय सेवा

11.                 उपाहारगृहांमधून घरपोचसेवा

12.                औषधी निर्मिती, डाळ व भात गिरणी, इतर जीवनावश्यक अन्नपदार्थ निर्मिती, साखर, दुग्धजन्य पदार्थ, पशुखादय, चारा निर्मिती घटक, इत्यादी

13.                रूग्णालये, औषधालयेआणि चष्म्याची दुकाने, औषधांचेकारखाने, विक्रेते आणि वाहतूक

14.              पेट्रोल पंप, एलपीजीगॅस, ऑईल एजन्सीज त्यांचीसाठवण आणि त्यांच्याशी संबंधितवाहतूक व्यवस्था

15.               टँकर्सदवारे पाणी पुरवठा करणाऱ्या सेवा

16.                पावसाळयापूर्वीची सर्व अत्यावश्यक कामे

17.               त्यावश्यक सेवांकरिता खासगीसंस्थांमार्फत पुरविल्या जाणाऱ्या सुरक्षासेवेसहअन्य सेवा देणाऱ्या संस्था

18.               त्यावश्यक सेवांना किंवाकोविड १९ प्रतिबंधासाठी होणाऱ्याप्रयत्नांना मदत करणारी खासगीआस्थापने.

19.                वरील बाबींशी संबंधितपुरवठा साखळी

20.               तत्वतः वरील सर्वनिर्बंध, लोकांच्या वाहतुकीवर निर्बंधघालण्यासाठी आहेत. वस्तूंच्या दळणवळणावरनिर्बंध घालण्यासाठी नाहीत, हे सर्व अंमलबजावणी कार्यालयांनीलक्षात घ्यावे, असेही अधिसूचनेतम्हटले आहे.

21.                अत्यावश्यक वस्तू व सेवांचा पुरवठा करणाऱ्या संस्था तसेच संबंधित कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या वाहनांवर अत्यावश्यक सेवा असे ठळकपणे दिसणारे स्टिकर लावणे बंधनकारक असल्याचे संबंधित यंत्रणांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत कळविण्यात येईल.

Most Popular

To Top