महाराष्ट्र

राज्यातील 24 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी; नवीन 28 रुग्णांची नोंद


एकूरुग्ण संख्या 153, राज्यात करोनाचा 5 वा मृत्यू

मुंबई दि.27आज राज्यात आणखी 28 कोविड 19 रुग्णांची नोंद झाली त्यामुळे एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 153 झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये इस्लामपूर सांगली मधील बाधित रुग्णांच्या संपर्कातील 15 व्यक्तींचा तर नागपूर मधील काल बाधित आलेल्या रुग्णांच्या 4 सहवासितांचा समावेश आहे.  या शिवाय प्रत्येकी 2 रुग्ण मुंबई आणि ठाणे येथील असून पालघर, कोल्हापूर, गोंदिया आणि पुण्यात प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे तर 1 रुग्ण गुजरात राज्यातील आहे.  आज मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात 65 वर्षाच्या एका वृध्देचा करोना मुळे मृत्यू झाला. हा करोनामुळे झालेला राज्यातील पाचवा मृत्यू आहे.  आज मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात एका 85 वर्षीय डॉक्टरांचा संशयित करोना आजाराने मृत्यू झाला. त्यांचे दोन नातेवाईक नुकतेच इंग्लंडहून परतले आहेत. या रुग्णाला मधुमेह होता तसेच त्यांना पेसमेकरही होता. त्यांचे निदान खाजगी प्रयोगशाळेत झालेले असल्याने त्याबाबत खातरजमा करण्यात येत आहे. 

  राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे

.क्र.

जिल्हा / मनपा

बाधित रुग्ण

मृत्यू

पिंपरी चिंचवड मनपा

13

पुणे मनपा

18

मुंबई

51

4

सांगली

24

नवी मुंबई , कल्याण डोंबिवली

प्रत्येकी 6

1*

नागपूर

9

ठाणे

5

यवतमाळ

 4

अहमदनगर

         3

सातारा, पनवेल

प्रत्येकी 2

१०

उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, वसई विरार,पुणे ग्रामीण, सिंधुदुर्ग, पालघर, कोल्हापूर, गोंदिया, गुजरात

प्रत्येकी 1

एकूण

153

5

* मुंबई कार्यक्षेत्रातील मृत्यू

राज्यात आज एकूण 250 जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत.   18 जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत 3493 जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी 3059 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 153 जण पॉझिटिव्ह आले आहेत.  आतापर्यंत 22 करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 16, 513 व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून 1045 जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत. नवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले आहेत.

राज्य नियंत्रण कक्ष

०२०/२६१२७३९४  टोल फ्री  क्रमांक १०४

Most Popular

To Top