महाराष्ट्र

असा होता आठवडा (दि. २२ मार्च ते २८ मार्च २०२० )

दि. 22 मार्च, 2020

·     मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांचे लाईव्ह प्रसारण- महत्वाचे मुद्दे – मध्यरात्रीपासून राज्यात 144 कलम लागू, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यक्तिंना प्रवास करता यावा म्हणून शहरांतर्गत बस सेवा सध्या सुरु राहणार, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, भाजीपाला, औषधी, वीजपुरवठा करणारी केंद्रे सुरु राहणार, वित्तीय सेवा देणाऱ्या शेअर बाजार आणि बँकासारख्या संस्था सुरु राहणार, शासकीय कार्यालयातील उपस्थिती केवळ 5 टक्के करणार. जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध, ही दुकाने किंवा या सेवा बंद राहणार नाहीत, त्यामुळे साठा करून ठेऊ नका, अजिबात घाबरून जाऊ नका, विलगीकरण कक्षात असलेल्या नातेवाईकांची काळजी करण्याची गरज नाही, त्यांची काळजी शासन आणि महापालिका घेत आहे. परदेशातून आलेल्या ज्या व्यक्तींना घरात क्वारंटाईन होण्यास सांगितले आहे, त्यांनी दक्षता घ्यावी, बाहेर फिरु नये, आपल्या कुटुंबीयांपासून स्वत:ला दूर ठेवावे, ज्यांच्या हातावर शिक्के मारले आहेत, त्यांनी बाहेर समाजात किंवा घरातल्या लोकांमध्ये मिसळून प्रादुर्भाव वाढवू नये, किमान15 दिवस बाहेर जाऊ नये, ज्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे, त्यांनी काही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांना भेटावे.

·     राज्यात करोना बाधित १० नवीन रुग्ण; राज्यातील एकूण रुग्ण संख्या ७४,मीच माझा रक्षकसंदेशाचे पालन प्रत्येकाने करावे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

·     करोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी महावितरणला आपल्या दैनंदिन कार्यपद्धतीत बदल करण्याचे, उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे आदेश, मीटर रिडींग करण्यासाठी व बिलाचे वितरण करण्यासाठी ग्राहकांच्या घरी 23 मार्चपासून पुढील आदेश येईपर्यंत जाऊ नका, या काळात मीटर रिडींग न झाल्यामुळे ग्राहकांना सरासरी बिल पाठवा, या कालावधीत थकबाकीसाठी ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करु नका, वीजचोरी व  बिलासंबंधीच्या तक्रारीला अनुसरून ग्राहकांच्या घरी भेटी देऊन तपासणी करू नका.

·     होम क्वारंटाईनच्या सूचना असलेल्यांनी स्थलांतर केल्यास महसूल आणि पोलीस यंत्रणेमार्फत कायदेशीर कारवाईचे शासनाचे निर्देश.

·     करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या रुग्णांची चाचणी करण्याकरता अधिक चाचणी केंद्रे उपलब्ध व्हावेत, या दृष्टीने वैद्यकीय शिक्षण विभागाने डिपार्टमेंट ऑफ हेल्थ रिसर्च अँड इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडे  केलेली नव्याने केंद्रांची मान्यता देण्याची विनंती केंद्र सरकारकडून मान्य, यानुसार मुंबईतील परळ येथील हाफकिन इन्स्टिट्यूट आणि पुण्यातील  बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून जनरल हॉस्पिटल यांना करोना चाचणी केंद्र सुरू करण्यास मान्यता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि खाजगी केंद्रांच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत करोना तपासण्यांची क्षमता शंभरहून बावीसशे पर्यंत वाढवणार असल्याची, वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती.

दि. 23 मार्च, 2020

·     रोना विषाणू (कोविड19) चा प्रसाररोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा भागम्हणून विविध कायद्यांतर्गत उपलब्धअसलेल्या अधिकारांचा उपयोग करूनसंपूर्ण महाराष्ट्रात 31 मार्चपर्यंतबंदी आदेश लागू करण्याचीअधिसूचना, मुख्य सचिव श्री. अजोय मेहता यांच्या मार्फत जारी. या अधिसूचनेनुसारअत्यावश्यकआणि नाशवंत वस्तू वगळताअन्य सर्व वस्तूंच्या दळणवळणासाठीराज्याच्या सर्व सीमा बंद, एसटी महामंडळाच्या बसेसआणि मेट्रो यांसह एकाशहरातून दुसऱ्या शहराला जोडणाऱ्यासर्व सार्वजनिक वाहतूक सेवाबंद, चालकाव्यतिरिक्त अन्यदोन व्यक्तींसाठी टॅक्सीतर एका प्रवाशासह टो रिक्षायांना अधिसूचनेत नमूद केलेल्याकारणांसाठी वाहतुकीला परवानगी,  अत्यावश्यक वैद्यकीय सेवेसाठीप्रवासी वाहतूक करण्यास मान्यता, अत्यावश्यक वस्तू, आरोग्यसेवा आणिया अधिसूचनेत नमूद बाबीयांकरिता वाहनचालकांव्यतिरिक्त एकाव्यक्तीला खासगी वाहन उपयोगातआणण्याची परवानगी, एका राज्यातून दुसऱ्या राज्यातजाणाऱ्या बससेवा आणि खासगीप्रवासी वाहतूक सेवा यांनाबंदी,विलगीकरणात राहण्याचा निर्दे देण्यातआलेल्या प्रत्येक व्यक्तीने त्याचे पालनकरणे आवश्यअन्यथा त्यांच्यावरदंडात्मक कारवाई करुन त्याचे शासकीयविलगीकरण व्यवस्थेत स्थलांतर, अत्यावश्यक कामांसाठी बाहेर पडल्यानंतर त्यांना परस्परांपासूनकिमान अंतर राखण्याचा दंडकपाळणे आवश्यक, सार्वजनिक ठिकाणीपाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्रयेण्यास बंदी, व्यावसायिक आस्थापने, कार्यालये, कारखाने, कार्यशाळा, गोदामेआदींसह सर्व दुकानांचे व्यवहारबंद, तथापि, वस्तूंची निर्मितीकरणारे प्रक्रिया सातत्य(कंट्युनिअस प्रोसेस) आवश्यक असलेलेकारखाने, औषध विक्री आदीसुरू ठेवण्यास परवानगी, डाळ, तांदूळ, अन्नधान्यविषयक बाबी, दूधविषयक पदार्थ, पशुखाद्य अशाअत्यावश्यक वस्तूंच्या निर्मितीच्या कारखान्यांची कामे सुरू ठेवण्यास परवानगी, शासकीय कार्यालये आणि सुरूठेवण्यात येणारी दुकाने आणिआस्थापने यांनी कमीतकमी कर्मचारीवर्गअसण्याची आणि परस्परांपासून किमानअंतर राखण्याची (जसेचेकआऊट काउंटरवर तीन फुटाचेअंतर राखण्यासाठी जमिनीवरखुणा करणे) दक्षता बाळगणे आवश्यक, अत्यावश्यक वस्तू सेवापुरविणाऱ्या खालील दुकाने आणिआस्थापने यांना वरील निर्बंधातूनसूट– 1. बॅंका/ एटीएम, विमा, फिन्टेकसेवा आणि अन्य संबंधितसेवा, 2. मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिकमाध्यमे, 3. टेलिकॉम, टपाल, इंटरनेट, डेटासेवा यांसह माहिती तंत्रज्ञानआणि माहिती तंत्रज्ञान सेवा, 4. त्यावश्यकवस्तूंची पुरवठा साखळी आणिवाहतूक, 5. शेतमाल आणि अन्यवस्तूंची निर्यात आणि आयात, 6. खाद्यपदार्थ, औषधे आणि वैद्यकीयउपकरणे यांसह आत्यावश्यक वस्तूंचेकॉमर्सद्वारे वितरण, 7. खाद्यपदार्थ, किराणा, दूध, ब्रेड, फळे, भाजीपाला, अंडी, मांस, मासे यांची विक्री, वाहतूक आणि साठवण, 8. बेकरीआणि पाळीव प्राण्यांसाठीचे खाद्यपदार्थआणि पशुवैद्यकीय सेवा, 9. उपाहारगृहांमधून घरपोच सेवा, 10. रूग्णालये, औषधालयेआणि चष्म्याची दुकाने, औषधांचेकारखाने, विक्रेते आणि वाहतूक, 11. पेट्रोल पंप, एलपीजी गॅस, ऑईल एजन्सीज त्यांची साठवणआणि त्यांच्याशी संबंधितवाहतूक व्यवस्था, 12. त्यावश्यक सेवांकरिताखासगी संस्थांमार्फत पुरविल्याजाणाऱ्या सुरक्षासेवेसह अन्यसेवा देणाऱ्या संस्था, 13. त्यावश्यकसेवांना किंवा कोविड 19 प्रतिबंधासाठीहोणाऱ्या प्रयत्नांना मदतकरणारी खासगी आस्थापने, 14. वरीलबाबींशी संबंधित पुरवठा साखळी, 15. वरीलसर्व निर्बंध, लोकांच्या वाहतुकीवरनिर्बंध घालण्यासाठी आहेत. वस्तूंच्या दळणवळणावर निर्बंधघालण्यासाठी नाहीत, हे सर्वअंमलबजावणी कार्यालयांनी लक्षातघेण्याची बाब, अधिसूचनेत स्पष्ट, राज्य शासनाचे  विभाग आणि कार्यालये आणि सार्वजनिक उपक्रम हे फक्त अत्यावश्यक सेवा देण्यासाठीच कार्यरत राहतील, कोणत्याही संप्रदायांची सर्व धार्मिक स्थळे  सुयोग्य अशा प्रतिबंधात्मक आदेशान्वये बंद करण्यात येतील, बंदीच्या काळात अत्यावश्यक गरजेच्या वस्तुंच्या पुरवठ्याबाबत कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जातील, कोविड-19 च्या रूग्णांना योग्य त्या आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व  खाजगी आणि शासकीय रूग्णालयातील वैकल्पिक शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात येतील, गरज भासल्यास, आरोग्य सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी, सर्व विभागीय आयुक्त, महानगर पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना रूग्णालयाच्या आसपास उपलब्ध जागांचा शोध घेण्याचे निर्देश, सध्या करोना विषाणू मुक्त असलेल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे त्यांच्या जिल्ह्यात बाहेरून वाहने येण्यास प्रतिबंध करणारे आदेश काढू शकतील. या जिल्ह्यांमध्ये वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशिम, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, बीड, जालना, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. हा आदेश अत्यावश्यक वैद्यकीय कारणासाठी लागू नाही, सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, महानगरपालिकांचे आयुक्त आणि इतर संबंधित संस्था, आस्थापना यांचे सक्षम प्राधिकारी यांना, मानवीय व न्यायपूर्ण पद्धतीने वरील सर्व उपाययोजना  व तरतूद यांची अंमलबजावणी करण्यासाठी अधिकार, कोणतीही व्यक्ती, संस्था या तरतुदींचा भंग करतील त्यांच्यावर साथ रोग कायदा – 1897 , आपत्ती व्यवस्थापना कायदा – 2005 आणि इतर कायदे व विनियमने यानुसार कारवाई अथवा सद्हेतुने कारवाई करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध वा तसा हेतू असणाऱ्या व्यक्तींविरूद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार नाही.

·     शहीद दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री अस्लम रमजान अली शेख यांच्यामार्फत मंत्रालयात शहीद भगत सिंग, राजगुरु व सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन

·     करोनासंसर्ग रोखण्यासाठी राज्यात संपूर्ण संचारबंदीचा विचार, रस्त्यावर गर्दी  करणाऱ्यांची गय नाही, निर्बंध मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा

·     मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांचा, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरंसिगच्या माध्यमातून संवाद, यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार,  महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,  उद्योग मंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उपस्थित. महत्वाचे मुद्दे- ट्रॅकिंग ॲण्ड ट्रेसिंगचे काम प्रभावीपणे करा, विषाणूच्या चाचणीसाठी आवश्यक असणारे किटस, मास्क, व्हेंटिलेटर, रुग्णालयाची सुसज्जता  याकडे लक्ष द्या, मोठ्याप्रमाणात रुग्ण आल्यास तात्पुरत्या पण सुसज्ज आरोग्य यंत्रणा निर्माण करा, अशा रुग्णालयांच्या निर्मितीसाठी आवश्यकता असल्यास लष्कराचे मार्गदर्शन घ्या, गावपातळीवर काम करणारी आशा आणि अंगणवाडीसारखी यंत्रणा सज्ज ठेवा, त्यासाठी त्यांना आवश्यक प्रशिक्षण द्या, मला काही होणार नाही या भ्रमात राहू नका, एक माणूस एक काम या पद्धतीने जिल्हास्तरावर कामाची विभागणी  करा, सक्षमपणे यंत्रणा कार्यरत राहावी यासाठी यंत्रणेत काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या आरोग्याची काळजी घ्या, औषधे तयार करणाऱ्या आणि पुरवठा करणाऱ्या यंत्रणा चालू राहतील याची काळजी घ्या, जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्याची व्यवस्था उभी करा, कुठल्याही जाती-धर्माच्या प्रार्थनास्थळावर गर्दी होणार नाही याची काळजी घ्या, प्रत्येक जिल्ह्याचा वाहतूक नियोजन (ट्रान्सपोर्ट प्लॅन) तयार करा, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या यंत्रणेतील कर्मचारी- अधिकारी यांना कामावर कसे  येता येईल याची माहिती त्यांना द्या,  ज्या खाजगी रुग्णालयात विलगीकरण वॉर्ड तयार करता येऊ शकतील त्यांना असे वॉर्ड तयार करण्याच्या सूचना द्या, त्यांची यादी मंत्रालयात पाठवा, विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करा-श्री अजित पवार, जनजागृती वाढावी- श्री बाळासाहेब थोरात, ब्लड कॅम्प आयोजित करण्याची गरज- राजेश टोपे, जीवनावश्यक वस्तु पुरवठा सुरळित ठेवा- सुभाष देसाई

·     भायखळायेथील जे.जे.  रुग्णालयात निर्माण करण्यातआलेल्या चाचणी केंद्र आणिकरोनाबाधित रूग्णांसाठी तयारकरण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाची, वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री अमित देशमुख यांच्यामार्फत पाहणी.

·     मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांचा जनतेशी लाईव्ह संवाद-       महत्वाचे मुद्दे- जनतेच्या हितासाठी कर्तव्यभावनेने राज्यात संचारबंदी लागू, विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय, महाराष्ट्राच्या जिल्ह्याच्या सीमा सील,जिथे विषाणुचा अजून प्रादुर्भाव झालेला नाही, तिथे विषाणू पोहोचू नये, हा त्यामागचा उद्देश, जीवनावश्यक वस्तू, औषधे, औषधे निर्माण करणारे कारखाने, दूध, बेकरी,  कृषी उद्योगांशी संबंधित दुकाने, पाळीव प्राण्यांच्या खाद्यांची दुकाने आणि दवाखाने सुरु राहणार, कृषी उद्योगाशी संबंधित वाहतूक सुरु राहणार, अत्यावश्यक सेवेमध्ये खाजगी वाहने रस्त्यांवर उतरतील, टॅक्सीमध्ये चालक अधिक दोन व्यक्ती तसेच रिक्षांमध्ये चालक अधिक एक व्यक्ती अशी परवानगी, फक्त  अत्यावश्यक सेवेसाठी देण्यात येईल, आरोग्य व्यवस्थेला सज्ज राहण्याच्या सूचना, अंगणवाडी सेविका, आशा, होमगार्ड यांना प्रशिक्षण.

·     सर्व इएमआय, इन्स्टॉलमेंट्सची वसुली तात्पुरती थांबवण्याची, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची केंद्र सरकारकडे मागणी.

·     राज्यात 15 नवीन करोना बाधित रुग्ण, एकूण रुग्ण संख्या 89 असल्याची ,आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

      

दि. 24 मार्च, 2020

·     करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात ‘नियंत्रण कक्षांची’ स्थापना.

·     उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन- मुद्देराज्यप्रवेशबंदी, जिल्हा प्रवेशबंदी, संचारबंदीची कठोर अंमलबजावणी, पोलिसांना अंमलबजावणीसाठी संपूर्ण स्वातंत्र्य, नागरिकांनी घरीच थांबून सहकार्य करावे, खरेदीसाठी बाजारात गर्दी करु नये, भाजीपाला, फळे, अन्नधान्य जीवनावश्यक पुरवठा सुरळीत ठेवणार, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवणे ही सरकारची जबाबदारी, कृषी उत्पन्न बाजार समितीतील आवक सुरळीत ठेवणार, भाजीपाला, फळ उत्पादक शेतकऱ्यांचा माल बाजारात येणार, त्यांचे नुकसान होणार नाही, आरोग्य अधिकारी, कर्मचारी, पोलिस  चांगले काम करत आहेत, आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी उपाययोजना सुरु, व्हेंटीलेटर्सची संख्या वाढवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु. मास्क, सॅनिटायझर, औषधे, जीवनावश्यक वस्तूंचा अवैध साठा, काळाबाजार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन तुरुंगात टाकणार.

·     राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी, जनतेला गुढी पाडव्यानिमित्त शुभेच्छा, अभूतपूर्व संकटाच्या पार्श्वभूमीवर गुढीपाडवा साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन.

·     मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, संयम, स्वंयशिस्त आणि सहकार्यातून संकटावर मात करण्याची जिद्द मनात बाळगावी, यातून हे संकट हद्दपार करण्याचा संकल्प या नवीन वर्षाच्या निमित्ताने करण्याचे आवाहन.

·     उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा, करोना संपल्यानंतरचा आनंद साजरा करण्यासाठी उत्साह राखून ठेवा, कोरोनाच्या पार्श्वभूमिवर गुढीपाडवा घरात थांबूनच साजरा करण्याचे श्री पवार यांचे आवाहन.

·     अखंडित वीजपुरवठ्यामुळेच जनतेला कोरोना विषाणू पादुर्भावाच्या काळात घरात थांबवणे झाले शक्य, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे प्रतिपादन, डॉ. राऊत यांनी केले वीज अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक.

·     अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या शासकीय व खाजगी कर्मचाऱ्यांसाठी एसटी व बेस्टसेवा सुरु ठेवण्याचा निर्णय. वेळापत्रक – मध्य रेल्वेमार्गावरील डोंबिवली व कल्याण(सकाळी ८:००,८:१५) येथून तसेच पश्‍चिम रेल्वेमार्गावरील नालासोपारा व विरार (सकाळी ७:००,७:१५) येथून थेट मंत्रालयासाठी  बसेसची सोय, बेस्ट मार्फत. बोरीवली स्टेशन – मंत्रालय (८:००,८:३०),शासकीय वसाहत बांद्रा- मंत्रालय (८:३०,९:००), पनवेल एसटी स्टँड -मंत्रालय (७:३०,८:३०) ठाणे कॅडबरी जंक्शन- मंत्रालय (८:००,८:३०) डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान चेंबूर- मंत्रालय (८:३०,९:००) विक्रोळी डेपो- मंत्रालय(८:३०,९:००)पि.के.खुराणा चौक वरळी-मंत्रालय (८:४५,९:००), बृहन्मुंबई महापालिका , शासकीय व खाजगी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, औषध दुकानदार,पोलीस, विविध बँकांमध्ये काम करणारे कर्मचारी इत्यादी केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांची ने-आण करण्यासाठी मुंबईच्या प्रवेशद्वारावरून म्हणजेच पनवेल, पालघर, आसनगाव, विरार, कल्याण, बदलापूर या रेल्वे स्थानकाहून मुंबईतील  बोरिवली, वाशी दादर व ठाणे (खोपट) या प्रमुख रेल्वे स्थानकांपर्यत (तेथून पुढे बेस्ट बसेसद्वारे शहरांतर्गत वाहतूक होईल.) एसटीच्या बसेस  दर 5 मिनिटांला या प्रमाणे सुरू, या बसेस 1. डोंबिवली-ठाणे, 2. पनवेल-दादर, 3. पालघर-बोरिवली, 4. विरार- बोरिवली,           5. टिटवाळा-ठाणे, 6. आसनगाव- ठाणे, 7. कल्याण- ठाणे, 8. कल्याण-दादर, 9 बदलापूर-ठाणे,10. नालासोपारा-बोरिवली या मार्गावर धावतील,

·     सर्वधर्मगुरूंनी आरोग्यदूतबनून जनजागृती करावी, मी घरी थांबणार, कोरोनाला हरवणार, गुढीपाडव्यानिमित्त संकल्प करण्याचे,- आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

·     मॉरिशसमध्ये अडकून पडलेल्या नांदेडच्या सहा विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याद्वारे मुख्यमंत्र्यांना पत्र.

·     विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, धान खरेदीला 31 मे पर्यंत मुदतवाढ देण्याची, अन्न,नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची  घोषणा.

·     करोना विषाणूच्या संसर्गामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीचा विचार करुन विधानपरिषदेच्या धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीला मुदतवाढ .

·     राज्यात 18 नवीन करोना बाधित रुग्ण, एकूण रुग्ण संख्या 107 झाल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

·     लाईव्ह प्रसारणाच्या माध्यमातून मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांचा जनतेशी संवाद –महत्वाचे मुद्दे– संकटात संधी शोधू नका, साठेबाजांना इशारा, जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक सुरु राहण्याची ग्वाही, जीएसटी रिर्टन दाखल करण्यास मुदतवाढ दिल्याबद्दल तसेच विषाणुच्या चाचणीसाठी प्रयोगशाळांची संख्या वाढवल्याबद्दल केंद्र सरकारला धन्यवाद, अन्नधान्याचा पुरेसा साठा उपलब्ध, त्याची वाहतूक आणि वितरण व्यवस्था सुरळित ठेवण्याच्या सूचना, शेतकरी, शेतमजूर यांना शेतात जाण्यास, काम करण्यास मनाई नाही. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक थांबवलेली नाही. शेतमालाची वाहतूक करण्यास बंदी नाही. जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळित राहावा यासाठी ही उत्पादने तयार करणाऱ्या कारखान्यांवर, कंपन्यांवर बंदी नाही. ज्या कंपन्या अशाप्रकारे जीवनावश्यक वस्तुंचे उत्पादन करतात त्यांनी आपल्या वाहनांवर कंपनीचे नाव, उत्पादन, कर्मचारी यांची माहिती देणारे ओळखपत्र लावावे, त्यांना वाहतुकीत अडवले जाणार नाही, सध्याच्या परिस्थितीत  रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन लालबागचा राजा मंडळाने पुढे येऊन रक्तदान शिबीरे आयोजित करण्यासारखा अनोखा कार्यक्रम केला, अशाप्रकारे योग्य काळजी घेऊन इतर संस्थांनी रक्तदान शिबीरांचे आयोजन करावे, या विषाणुचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जिल्ह्यांच्या सीमा सील, आतापर्यंत जिथे विषाणुचा प्रादुर्भाव झाला नाही तिथे तो पोहोचू नये, म्हणून हा निर्णय, जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक, कंपन्या, कारखाने, बँका बंद नाहीत. येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी अडचणी येत असतील तर त्यांनी 100 नंबरवर फोन करून पोलीसांची मदत घ्यावी.  

·     कोविड19 (रोनाविषाणू) याचा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून विविधकायद्यांतर्गत उपलब्ध असलेल्या अधिकारांचाउपयोग करून संपूर्ण महाराष्ट्रातयेत्या 31 मार्चपर्यंत बंदीआदेश लागू करण्याची अधिसूचनाशासनामार्फत जारी, या अधिसूचनेनुसार अत्यावश्यक वस्तू सेवा पुरविणाऱ्या दुकानेआणि आस्थापनयांना पुढील निर्बंधातूनसूट – किमान मनुष्यबळासह शासकीय लेखा व कोषागरे आणि संबंधित कार्यालये, वाणिज्य दुतावास आणि परकीय संस्थांची कार्यालये, किमान मनुष्यबळासह बॅंका/ एटीएम, भारतीय रिझर्व्ह बँक, फिन्टेक सेवा (स्टॉक एक्सचेंज, क्लीअरींग ऑपरेशन्स, म्युच्युअल फंडस, स्टॉक ब्रोकर्स) अन्य संबंधित सेवा, विमा, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, कॅश लॉजिस्टिक आणि  कॅश ट्रान्झॅक्शन कंपन्या, मुद्रितआणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे, टेलिकॉम, टपाल, इंटरनेट, डेटासेवायांसह माहिती तंत्रज्ञान आणिमाहिती तंत्रज्ञान सेवा, अत्यावश्यकवस्तूंची पुरवठा साखळी आणिवाहतूक, शेतमाल आणि अन्यवस्तूंची निर्यात आणि आयात, बंदरे आणि त्यावरुन होणारी वाहतूक, मनुष्यबळ,कंटेनर फ्राईट स्टेशनचे कार्यान्वयन, साठवणूक, कस्टम हाऊस एक्सचेंजची कार्यालये, रेल्वेच्या अत्यावश्यक सेवा, खाद्यपदार्थ, औषधे आणि वैद्यकीय उपकरणेयांसह त्यावश्यक वस्तूंचे कॉमर्सद्वारेवितरण,खाद्य पदार्थ, किराणा, दूध, ब्रेड, फळे, भाजीपाला, अंडी, मांस, मासे यांचीविक्री, वाहतूक आणि साठवण,बेकरीआणि पाळीव प्राण्यांसाठीचे खाद्यपदार्थआणि पशुवैद्यकीय सेवा, उपाहारगृहांमधून घरपोच सेवा, औषधी निर्मिती, डाळ व भात गिरणी, इतर जीवनावश्यक अन्नपदार्थ निर्मिती, साखर, दुग्धजन्य पदार्थ, पशुखादय, चारा निर्मिती घटक, इत्यादी, रूग्णालये, औषधालयेआणि चष्म्याची दुकाने, औषधांचेकारखाने, विक्रेते आणि वाहतूक, पेट्रोल पंप, एलपीजी गॅस, ऑईल एजन्सीज त्यांची साठवणआणि त्यांच्याशी संबंधितवाहतूक व्यवस्था, टँकर्सदवारे पाणी पुरवठा करणाऱ्या सेवा, पावसाळयापूर्वीची सर्व अत्यावश्यक कामे, अत्यावश्यक सेवांकरिताखासगी संस्थांमार्फत पुरविल्याजाणाऱ्या सुरक्षासेवेसह अन्यसेवा देणाऱ्या संस्था, अत्यावश्यकसेवांना किंवा कोविड 19- प्रतिबंधासाठीहोणाऱ्या प्रयत्नांना मदतकरणारी खासगी आस्थापने, वरीलबाबींशी संबंधित पुरवठा साखळी, अत्यावश्यक वस्तू व सेवांचा पुरवठा करणाऱ्या संस्था तसेच संबंधित कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या वाहनांवर अत्यावश्यक सेवा असे ठळकपणे दिसणारे स्टिकर लावणे बंधनकारक.

·     करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्‌भवलेली स्थिती लक्षात घेता औषध वितरण नियमित ठेवणे आणि उत्पादन सुरळीत ठेवण्यात येणाऱ्या अडचणींच्या निराकरणासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या मुख्यालयात  श्री. सुनील भारद्वाज, पोलीस अधिक्षक तथा सह आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली, दक्षता नियंत्रण कक्ष स्थापन, 1800222365,दूरध्वनी क्र 022-26592362/63,

दि. 25 मार्च, 2020

·     गुढी पाडव्यानिमित्त मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे यांचे आवाहन – घरी राहा, सुरक्षित राहा, हरवलेले कुटुंब सुख अनुभवा, एसीचा वापर टाळा.

·     मुख्यमंत्री अजित पवार यांच्याद्वारे साधेपणाने गुढीपाडवा साजरा, देशातील पहिले दोन रुग्ण करोनामुक्त झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आनंद; ‘करोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर-कर्मचाऱ्यांचे मानले आभार.

·     आरोग्याशी निगडीत वस्तुंची निर्मिती करणाऱ्या उत्पादकांनी सॅनिटायझर,  मास्क, व्हेंटीलेटर्स, नेब्युलायझर्स यासह इतर आवश्यक वस्तुंचा शासनास पुरवठा करण्याचे, आवाहन उद्योगमंत्री श्री. सुभाष देसाई यांचे आवाहन, यासाठी समन्वयक म्हणून मराठी  भाषा सचिव श्रीमती प्राजक्ता लवंगारे  (sec.marathi@maharashtra.gov.in) याशिवाय  उद्योग विभागाचे सचिव वेणुगोपाल रेड्डी (psec.industry@maharashtra.gov.in), उद्योग विभागाचे विकास आयुक्त हर्षदीप कांबळे (didci@maharashtra.gov.in),एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्वलगन (ceo@maharashtra.gov.in), मंत्रालयात सुरु करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षातील समन्वयक प्रधान सचिव भूषण गगराणी (ccrmaharashtra.aid@maharashtra.gov.in), अन्न व औषध प्रशासनाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी (psec.mededu@maharashtra.gov.in) यांच्याशी संपर्क करावा,  याशिवाय  min.industry@maharashtra.gov.in या इमेलवर संपर्क करण्याची श्री देसाई यांची विनंती.

·     सुरक्षेसाठी असलेले पोलीस आणि वाहन, पोलीस विभागाला वापरण्यास कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांची परवानगी.

·     करोना विरूद्धच्या लढाईत खबरदारीची उपाययोजना म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राज्यभरात २२ हजार ११८ खोल्यांची सज्जता, या ठिकाणी ५५ हजार ७०७ खाटांची सोय शक्य असल्याची, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची माहिती.  

·     राज्यातील करोना बाधित पहिले दोन रुग्ण पूर्णपणे बरे, नमुने निगेटिव्ह आल्यानंतर घरी परत, उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांच्याद्वारे अभिनंदन.

·      दि. 25 मार्च 2020 ची सुधारित अधिसूचना, राज्यात 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन, अत्यावश्यक वस्तू  सेवा पुरविणाऱ्या दुकाने आणि आस्थापनांना निर्बंधातून सूट, अत्यावश्यक वस्तू सेवा पुरविणाऱ्या दुकाने आणि आस्थापनयांना पुढील निर्बंधातून सूट -पोलीस, होमगार्ड, नागरी संरक्षण दल, अग्निशमन आणि अत्यावश्यक सेवा, आपत्ती व्यवस्थापन आणि कारागृह, मंत्रालय, जिल्हा प्रशासन, लेखा व कोषागार, वीज, पाणी आणि स्वच्छता, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पाणीपुरवठा व स्वच्छता याच्याशी संबंधित कर्मचारी, वाणिज्य दुतावास आणि परकीय संस्थांची कार्यालये, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, अन्न व नागरी पुरवठा आणि अन्न व औषध प्रशासन या कार्यालयांमधील अत्यावश्यक सेवा. मंत्रालय, शासकीय कार्यालये तसेच सुरू ठेवण्यात येणारी दुकाने आणि आस्थापनयांनी किमान कर्मचारी वर्ग असण्याची आणि परस्परांपासून किमान अंतर राखण्याची (जसे चेक आऊट काउंटरवर तीन फुटाचे अंतर राखण्यासाठी जमिनीवर खुणा करणे) दक्षता घ्यावी. स्वच्छता राखली जाईल याची दक्षता घ्यावी, किमान मनुष्यबळासह बॅंका/ एटीएम, भारतीय रिझर्व्ह बँक, फिन्टेक सेवा  (स्टॉक एक्सचेंज, क्लीअरींग ऑपरेशन्स, म्युच्युअल फंडस, स्टॉक ब्रोकर्स) अन्य संबंधित सेवा, विमा, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, कॅश लॉजिस्टिक आणि  कॅश ट्रान्झॅक्शन कंपन्या, आदरातिथ्याशी संबंधित सेवा स्थगित राहतील. तथापि, बंदी (लॉकडाऊन) मुळे अडकलेले पर्यटक, व्यक्ती, वैद्यकीय, अत्यावश्यक व आणिबाणीच्या सेवेतील कर्मचारी, हवाई आणि सागरी सेवेतील व्यक्तींच्या राहण्यासाठी उपयोगात आणले जाणारे हॉटेल्स, होम स्टे, लॉजेस आणि मॉटेल्स यांना व विलगीकरण (क्वारंटाईन) साठी वापरण्यात येणाऱ्या वास्तू (इस्टॅब्लीशमेंट) यांना यातून सूट, अंत्यविधीसारख्या प्रसंगी वीस पेक्षा अधिक व्यक्तींना परवानगी नाही, 15 फेब्रुवारी नंतर भारतात आलेल्या आणि विलगीकरणात राहण्याचा निर्दे देण्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीने या निर्देशाचे पालन करणे आवश्यक, अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई, आणि त्याला शासकीय विलगीकरण व्यवस्थेत स्थलांतरित, उपरोक्त निर्देशांचे पालन होण्याकरिता जेव्हा कधी आवश्यकता भासेल तेव्हा जिल्हा न्यायाधीशांमार्फत कार्यकारी न्यायाधीशांची नेमणूक, दवाखान्यांच्या पायाभूत सुविधा तसेच विस्तारीकरणाच्या कामासाठी होणाऱ्या साधनसामग्रीच्या वाहतुकीमध्ये बाधा येणार नाही याची जिल्हा प्रशासनाकडून दक्षता.

·     मुंबईतील दादर, भायखळा भाजीपाला मार्केट सुरू; नागरिकांना दिलासा, मुंबई शहराला सुरळीतपणे भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याची अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची घोषणा.

  दि. 26 मार्च, 2020

·     केंद्राने जाहीर केलेल्या पॅकेजप्रमाणे राज्यातील सर्व लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी यंत्रणेला सूचना देण्यात आल्याची  मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांची माहिती. 

·     सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी वर्षा निवासस्थान येथून व्हिडीओ  कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा संवाद, यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब उपस्थित. महत्वाचे मुद्दे– खासगी डॉक्टर्सनी त्यांचे दवाखाने सुरु ठेवणे गरजेचे, इतर आजारांच्या उपचारासाठी रुग्ण येतात, त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी लवकरच अत्यावश्यक सेवेतील सर्वांना ओळखपत्र, त्यात डॉक्टर,  त्यांच्याकडील कर्मचारी यांचा समावेश, परदेशातून गेल्या १५ दिवसांत जर कुणी प्रवास करून आले असेल तर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची माहिती घेऊन, या व्यक्तींची तपासणी करावी, करून, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्यवस्थित राहील, औषधे लोकांना मिळतील याची काळजी घ्यावी, इतर राज्यांतून महाराष्ट्रात येऊन थांबलेल्या नागरिकांची काळजी घ्या,  जीवनावश्यक वस्तूंसाठी उपयोगात आणली जाणारी वाहतूक पोलीस अडवणार नाहीत, पण अशा वाहनांमधून या कामाशी संबंधित नसलेले लोक प्रवास करताना आढळले तर कारवाई, प्रत्येक जिल्ह्यात किती रुग्ण क्वारंटाईन करू शकतो तसेच कोरोनासाठी किती वॉर्ड किंवा रुग्णालय राखून ठेवू शकतो त्याचे व्यवस्थित नियोजन करा.

·     करोनाच्या चाचणीसाठी महाराष्ट्रातील सहा ठिकाणच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये यंत्रसामुग्री उपलब्ध, झाली असून भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) त्याला तातडीने परवानगी द्यावी, अशी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे मागणी. 

·     राज्यात करोना बाधित ३ नवीन रुग्ण, एकूण रुग्ण संख्या १२५ झाल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती.

·     करोनाबाधित व्यक्तींच्या मदतीसाठी एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याची राज्यपालांची घोषणा, राजभवनातील कर्मचारी एक दिवसाचे वेतन देणार.

·     भाजीपाला, फळे व जिवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत सुरू राहील. ग्राहकांनी मार्केटमध्ये, दुकानात गर्दी करू नये, असे पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांचे आवाहन. 

·     शेतकरी, नोकरदार, कंत्राटी कर्मचारी, कामगार, व्यापारी, उद्योजक आदींना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने सर्व वित्तीय संस्थांच्या सर्व कर्जांचे देय हप्ते, ईएमआय, कॅश क्रेडीट व ओव्हर ड्राफ्टवरील व्याज, क्रेडीट कार्डांची बिले तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करावी, अशी, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची फेरमागणी.

·     करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी नागपुरातील किराणा दुकानदार देणार घरपोच सेवा, महापालिका क्षेत्रात नागरिकांसाठी व्यवस्था.

·     सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा मालाची दुकाने, औषधांची दुकाने ही २४ तास उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात असल्याची येत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची  घोषणा.

·     इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च  यासंस्थेची देशातील २७ खाजगी प्रयोगशाळांना करोना तपासणी केंद्र म्हणून मान्यता, यापैकी सर्वाधिक ८ प्रयोगशाळा महाराष्ट्रातील असल्याची, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती. यामध्ये थायरोकेअर टेक्नॉलॉजी लिमिटेड, नवी मुंबई, सबर्बन डायग्नोस्टिक प्रायव्हेट लिमिटेड, मेट्रोपोलीस हेल्थकेअर लिमिटेड, मुंबई, सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल, नवी मुंबई, एस. आर. एल. लिमिटेड, मुंबई, ए.जी. डायग्नोस्टिक प्रायव्हेट लिमिटेड, पुणे, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल लॅबरोटरी, मुंबई आणि इन्फेक्शन लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड, ठाणे यांचा समावेश.

·     केंद्र सरकारच्या पहिल्या करोना पॅकेजचे स्वागत; संकटाचे वळण लक्षात घेऊन वेळोवेळी नवे पॅकेज हवे, पॅकेजचे लाभ जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सर्व शक्तिनिशी प्रयत्न करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन.

·     करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे ठिकठिकाणी अडकून पडलेल्या ट्रकचालकांना इच्छितस्थळी पोहचण्यासाठी ट्रकवाहतुकीला परवानगी, यामुळे मालवाहू ट्रकवाहतूक पुन्हा सुरु होऊ शकेल, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केल्यानंतर रिकाम्या परतणाऱ्या वाहनांना पोलिसांकडून अडविण्यात येणार नाही, असा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृह मंत्री अनिल देशमुख उपस्थित. महत्वाचे निर्णय – शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ट्रॅक्टर, हार्वेस्ट्रर आदी वाहनांना पुरेसे पेट्रोल, डिझेल उपलब्ध करुन  देणार, शहरात एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गरीब नागरिक, रस्त्यावर राहणारे बेघर नागरिक यांच्यासाठी नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी खाजगी कंपन्यांच्या सहकार्याने कम्युनिटी लंगरसुविधा सुरु केली आहे, त्याच धर्तीवर खाजगी कंपन्या, स्वयंसेवी संस्था, संघटनांच्या सहकार्याने अन्य शहरात देखील कम्युनिटी किचन सुरु करणार, नागरिकांना रेडी टू इटकिंवा रेडी टू कूकअन्नपदार्थ उपलब्ध करुन देणार.

·     करोनाबधित १५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याची, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

·     डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांना घर सोडण्यास सांगितल्यास घरमालक, हाऊसिंग सोसायटीवर होणार कारवाई करण्याचा शासनाचा निर्णय

·     करोनाच्या संकटातून महाराष्ट्र मुक्त झाल्यानंतर रेडीरेकनर दर जाहीर होणार असल्याची, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती.

·     जीवनावश्यक वस्तू घरपोच सोसायटीपर्यंत पोहोचवण्याचे नियोजन व्हावे, डॉक्टर व पोलिसांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत; लष्कराच्या मदतीची वेळ येऊ न देणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन.

दि. २७ मार्च २०२०

·      देशातील बँका व वित्तीय संस्थांनी  कर्जवसुली तीन महिन्यांसाठी स्थगित करावी, असा केवळ सल्ला देऊन या बँका ऐकणार नाहीत त्यामुळे  त्यांना रिझर्व्ह बँकेकडून स्पष्ट निर्देश देण्याची उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री श्री अजित पवार यांची मागणी

·     राज्यात अंडी, कोंबडी, मटण, गोड्या व खाऱ्या पाण्यातील मासळीची विक्री खुली असून त्यावर कोणतेही बंधन नाही. कोकणातील आंबे, नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, केळी, कलिंगड अशी सर्वप्रकारची फळे बाजारात विकता येणार आहेत, दूध, भाजीपाला, फळांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना इंधनाचा पुरवठा करण्यात कोणताही अडथळा नाही, अशी  उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांची माहिती.

·     आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा फेसबूकद्वारे नागरिकांसोबत संवाद- महत्वाचे मुद्दे- करोनाचे संकट असताना खासगी डॉक्टरांनी भीतीपोटी दवाखाने बंद ठेवू नयेत, संवेदनशीलता दाखवून रुग्णालये सुरू करून नागरिकांना सेवा द्यावी, संचारबंदी काळात रक्तदान शिबीरे घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संस्थांना सहकार्य करावे, नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे, करोनाच्या प्रतिबंधासाठी ट्रेसिंग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीनुसार राज्यशासनाचे कार्य, १९ रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले, सध्या १३५ रुग्ण आढळून आले आहेत, आतपर्यंत ४२२८ जणांच्या करोनासाठी चाचण्या, त्यापेकी ४०१७ चाचण्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह, १३५ पॉझीटिव्ह, ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली आणि उपचाराचे व्यवस्थापन योग्य प्रकारे केले जात आहे असे करोनाबधीत रुग्ण बरे होत आहेत, नागरिकांनी सोशल डिस्टंसिंगचा नियम मोडू नये, सर्वपक्षीय कार्यकर्ते, सामाजिक संघटना, मंडळांच्या कार्यकर्त्यांनी हातात हात घालून गरजूंना घरपोच सेवा देण्यासाठी पुढाकार घ्यावा.

·     लॅटव्हियामध्ये अडकलेल्या ३७ भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे प्रयत्न.

·     सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतलेले निर्णय– करोना विषाणूच्या संकटकाळी दिव्यांगांना दिलासा देण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत विशेष उपाययोजना, हालचाल न करू शकणाऱ्या दिव्यांगांना एक महिन्याचे स्वस्त धान्य व आरोग्यविषयक किटचे घरपोच वाटप, यामध्ये धान्य, कडधान्य, डाळी, तांदूळ, तेल, सॅनिटायझर, मास्क, रुमाल, साबण, डेटॉल, फिनेल असे आरोग्यविषयक साहित्याचा समावेश, दिव्यांग व्यक्तींना हे साहित्य नजीकच्या रेशन दुकानातून उपलब्ध करून देण्यात येणार, ज्या ठिकाणी कम्युनिटी किचनकिंवा तत्सम सुविधा सुरू आहेत किंवा प्रस्तावित आहेत त्या ठिकाणी गरजू दिव्यांग व्यक्तींना घरपोच जेवण/नाष्टा डबे पुरविण्यात येणार, दिव्यांग व्यक्तींना बँका, पतसंस्था किंवा कोणत्याही वित्तीय संस्थांमध्ये विनारांग सुविधा देण्यात येणार, मनोरुग्ण, बेवारस किंवा निराश्रित असलेल्या व्यक्तींची सोय स्थानिक शेल्टर होम, आश्रम किंवा बालगृहात करणार, पात्र दिव्यांगांना एक महिन्याचे निवृत्तीवेतन आगाउ (ॲडव्हान्स)देण्यात देणार, प्रत्येक जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात दिव्यांगांसाठी एक हेल्पलाईन नंबर, टोल फ्री स्वरूपात प्राप्त सुरु करणार. या निर्णयासोबतच दिव्यांगांसाठी लॉकडाऊनच्या काळात मदतीसाठी सर्व महत्वाच्या शासकीय कार्यालये, पोलीस अधिकाऱ्यांचे कार्यालय तसेच सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाचे दूरध्वनी क्रमांकांची यादीही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या यादीसाठी खालीक लिंकवर क्लिक करा : https://twitter.com/dhananjay_munde/status/1243224267996585984?s=19

·     जे जे समूह रुग्णालयातील करोना रुग्णालयांसाठी नोडल ऑफिसर म्हणून विनिता सिंघल यांची नेमणूक केल्याची, वैद्यकीय शिक्षण मंत्री  अमित देशमुख यांची माहिती.

·     ऱिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने सर्व कर्जांच्या ईएमआयला तीन महिन्यांची स्थगिती देण्याची घोषणा केल्यामुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळाला, मात्र बॅंकांकडून या घोषणेची अंमलबजावणी करून घेण्यासाठी सतत पाठपुरावा करून त्यांच्यावर दबाव ठेवण्यात यावा, अशी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची मागणी.

·     राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमात समाविष्ट न झालेल्या विदर्भ व मराठवाड्यातील १४ जिल्ह्यांतील एपीएल (केसरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना एप्रिल, मे आणि जून २०२० या तीन महिन्यांकरिता सवलतीच्या दरात प्रतिव्यक्ती ५ किलो अन्नधान्य उपलब्ध करून देण्याची, अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांची घोषणा.

·     राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची, उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांसह करोना विषाणू आजारासंबंधी विविध विषयांवर सर्व राज्यांचे राज्यपाल, नायब राज्यपाल व केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजभवन येथून चर्चेत सहभाग.

·     ब्रह्मकुमारी संस्थेच्या प्रमुख दादी जानकी यांच्या निधनाबद्दल राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी यांना तीव्र दुःख.

·     राज्यातील २४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी,नवीन २८ रुग्णांची नोंद,एकूण रुग्ण संख्या १५३,राज्यातील करोनाचा ५ वा मृत्यू.

·     मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांचा व्हिडीओ  कॉन्फरंसिंगद्वारे विभागीय आयुक्तांशी संवाद- महत्वाचे निर्देश  कोणत्याही परिस्थितीत गरीब, कष्टकरी, हातावर पोट असणाऱ्या व्यक्ती उपाशी राहणार नाही याची खबरदारी घ्या, केंद्राने जाहीर केलेल्या पॅकेजप्रमाणे तसेच स्वस्त धान्य दुकानातील धान्य त्यांना तत्काळ उपलब्ध करुन द्या, गरिबांची अजिबात उपासमार होणार नाही,याची काळजी घ्या. या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री  अनिल देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे उपस्थित.

·     मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांचा नागरिकांशी समाजमाध्यमांद्वारे संवाद- महत्वाचे मुद्दे- आपण कोरोना निगेटिव्ह असले पाहिजे ,मात्र घरातले वातावरण पॉझिटिव्ह ठेवा, शिवभोजन केंद्रांना गरजू आणि भुकेल्या लोकांची भूक भागवता येणे शक्य व्हावे यासाठी त्यांचे उद्दिष्ट्य  1 लाख वाढवत आहोत, मात्र त्यासाठी गर्दी करून आरोग्याला धोका होईल असे वागू नका,जीवनाश्यक वस्तुचा पुरवठा व्यवस्थित होत राहील याची खात्री बाळगा, जीवनावश्यक वस्तूंच्या वाहनांतून, टँकर्स, कंटेनर यामधून कोणत्याही परिस्थितीत लोकांची वाहतूक होणार नाही याची दक्षता घ्या, ऊसतोड कामगार आणि त्यांच्या परिवाराची काळजी घ्या, हे कामगार आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे हे लक्षात ठेवा, ग्रामीण भागातून दूध संकलन व्यवस्थित होईल याची काळजी घ्या, परराज्यातील अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी येणाऱ्या संस्थानी गर्दी न करता मदत कार्य करा, खासगी डॉक्टरांनी दवाखाने सुरु ठेवावेत, राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने स्वयंसेवी संस्थांनी रक्तदान शिबिरे घ्यावीत  मात्र अनावश्यक गर्दी  करु नका, कुठल्याही परिस्थिती कायदा व सुव्यवस्था यांचे प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्या, वेळीच उपचार झाले तर कोरोना बरा होऊ शकतो, मात्र योग्य उपचार करुन घ्या.

दि.28 मार्च 2020

·     राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सर्व विभागीय आयुक्तांशी चर्चा; नागरिकांचे स्थलांतर थांबविण्याचे निर्देश.

·     मुंबईतीलकोरोनाविषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच करोना बाधितांच्या उपचारासाठी केल्या जाणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजना व होम क्वारंटाईनच्या  सुविधांचा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्याद्वारे आढावा.  मुंबई शहरात कालपर्यंत  347 व्यक्ती  होम कॉरंटाईनमध्ये, बृहन्मुंबईत एकूण 72 वैद्यकीय पथके  कार्यरत, क्वारंटाईन सुविधा – शासकीय वस्तीगृह उच्च शिक्षण मुंबई विभाग 700 बेड, विसावा विश्रामगृह वरळी 20 बेड, कार्यकारी अभियंता उत्तर मुंबई (सार्वजनिक बांधकाम विभाग, अंधेरी) 414 बेड, पश्चिम रेल्वे 95 बेड, मध्य रेल्वे 180 बेड, एकूण 5 हॉटेल्समध्ये 367 खोल्या. विलगीकरण सुविधा रुग्णालये– बृहन्मुंबई महानगरपालीका 908 बेड,  खाजगी 399 बेड, शासकीय 685 बेड

·     मुख्य सचिव श्री अजोय मेहता यांना तीन महिन्यांची मुदतवाढ

०००

Most Popular

To Top