महाराष्ट्र

जंतूनाशकांची फवारणी आवश्यकता असल्यास पालिकाच करणार ; सोसायट्यांनी स्वतः फवारणी करू नये

मुंबई, दि. 30 : सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबई तसेच राज्यातील इतर शहरांतील अनेक सोसायट्या व वस्त्या तसेच कॉलनीमध्ये जंतूनाशकांची फवारणी करणे सुरू आहे. परंतु या जंतूनाशकांच्या बेसुमार आणि अवाजवी फवारणीमुळे अपाय होऊ शकतो, त्यामुळे अशी फवारणी करू नये आणि करायची असल्यास  संबंधित महानगरपालिका प्रत्यक्ष त्या भागाची  तपासणी करून आवश्यकता भासल्यास स्वतः फवारणी करेल असे आज कोरोनासाठी स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाच्या बैठकीत ठरले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री सर्वश्री आदित्य ठाकरे, अनिल परब, मुख्य सचिव अजोय मेहता व वरिष्ठ अधिकारी उपास्थित होते

वर्षा निवासस्थानी ही बैठक झाली.

Most Popular

To Top