महाराष्ट्र

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक कोटी रुपये

मुंबई, दि. 31 : –  कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून दानशूर व्यक्ती, संस्था आदी घटक पुढे येत आहेत. राज्यातील प्रथितयश संस्था असलेल्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-१९ साठी एक कोटी रुपये देऊ केले आहेत.

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर या संस्थेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपल्या एक दिवसाच्या वेतनाइतका सुमारे एक कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचा निर्णय एकमताने घेतल्याचे संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी म्हटले आहे. हा निधी धनादेशाद्वारे सुपूर्द करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासन  कोरोनाच्या संकटाचा धैर्याने आणि कौशल्याने सामना करीत आहे, या प्रयत्नांना साथ देण्यासाठी विवेकानंद संस्था पुढे आल्याचे त्यांनी कळविले आहे.

Most Popular

To Top