महाराष्ट्र

शिर्डीच्या श्री साई बाबा मंदिर संस्थानकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ५१ कोटी जमा

मुंबई, दि. 31 : –  कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या आवाहनानुसार शिर्डीच्या श्री साई बाबा मंदिर संस्थानाकडून आज मुख्यमंत्री सहायता निधीत ५१ कोटी रुपये जमा करण्यात आले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून श्री साई संस्थानने ५१ कोटींचा निधी देण्याचे जाहीर केले होते. संस्थानाच्या या निर्णयाचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी स्वागत केले होते आणि आभारही मानले होते. निर्णयानुसार संस्थानाने आज ही रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केली.

Most Popular

To Top