महाराष्ट्र

राजपत्रित अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांचे एक महिन्याचे निवृत्ती वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

मुंबई, दि.31 : महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 साठी मार्च महिन्याच्या संपूर्ण निवृत्ती वेतनाची रक्कम देणगी म्हणून दिली आहे. या रकमेचा धनादेश त्यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई आणि उपाध्यक्ष विष्णू पाटील उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी श्री. कुलथे यांच्या मानवी दृष्टिकोनातून मदतीसाठी उचललेल्या पावलाचे मनःपूर्वक कौतुक केले.

Most Popular

To Top