महाराष्ट्र

सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी जितेंद्र आव्हाड

मुंबई, दि. 31 : शासनाच्या 8 जानेवारी 2020 रोजीच्या शासन निर्णयात अंशतः बदल करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र सतीश आव्हाड यांची सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती केली आहे. त्यासंदर्भातील शासन निर्णय राज्यपाल महोदयांच्या आदेशानुसार सामान्य प्रशासन विभागाने आज दि. 31 मार्च 2020 रोजी जारी केला आहे.

Most Popular

To Top