महाराष्ट्र

संकटकाळात शासनाकडून लाख मोलाची मदत!


जगभर कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावाला थांबविण्यासाठी वेगवेगळी पावले उचलेली जात आहेत. यातच भारतात 24 मार्चपासून भारत सरकारने देशभर लॉकडाऊनचा निर्णय घेतला. ‘जे लोक जिथे असतील त्यांनी तिथेच राहावे’ त्यांच्या जीवनावश्यक गरजांची सोय शासन यावेळी पूर्ण करणार, असे आश्वासन सरकारकडून देण्यात आले आहे.

व्यवसाय, नोकरी करणाऱ्यांना घरीच राहण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. ज्यांची कामे घरून होत असतील त्यांनी ती कामे घरी राहूनच करावी. केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, औषध विक्रेत्यांच्या दुकानांना यातून वगळण्यात आले आहे. यासह आवश्यक सेवेमध्ये मोडणाऱ्या अधिकारी-कर्मचारी यांना आळीपाळीने येण्याची सोय लॉकडाऊन असेपर्यंत राहणार आहे. ही सर्व व्यवस्था कोरोनाचा संसर्ग होऊ नये, प्रकोप वाढू नये या दृष्टीने करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनानेही वेगवेगळया उपयायोजना आखून प्रत्येकाला मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये तात्पुरत्या निवाऱ्याची, जेवणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. मी दिल्लीत नोकरी करते. माझ्या बाबांचे निधन 15 मार्चला झाल्यामुळे मी नागपूरला आले होते. प्रथेप्रमाणे सर्व सोपस्कार आटोपून मी 22 तारखेला अमरावती येथे सासरच्या नातेवाईकांकडे आले. रविवार दिनांक 23 तारखेला देशभर ‘जनता कर्फ्यू’ लावण्यात आला होता. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुढे 24 तारखेपासून सुरक्षिततेसाठी देशभर लॉकडाऊन घोषित केल्यामुळे नवी दिल्ली येथे जाता आले नाही. सर्वांनाच घरी राहावे लागत आहे. यामुळे कोरोनाच्या संक्रमणापासून बचाव होतच आहे, हे खरेच आहे. 

जे लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत त्यांची गैरसोय टाळण्यासाठी शासनातर्फे त्यांना घरपोच अन्न-धान्य पुरविण्यात आलेले आहे. सध्या मी अमरावतीतील यशोदानगर या परिसररात नातेवाईकांकडे आहे. घराच्या बाजूला असलेली ज्येष्ठ नागरिक पार्वताबाई गडलिंग (वय सुमारे 65 वर्ष) या एकट्याच राहतात. त्यांच्या मागे पुढे कुणीच नाही. या कठीण समयी शासनाच्या वतीने त्यांना महिनाभर पुरेल येवढे साहित्य पोलिसांमार्फत घरपोच मिळालेले आले. यामध्ये तांदूळ, गव्हाचे पीठ, डाळ, तेल, तिखट, मीठ, चहापत्ती, साखर असे सर्व किराणा साहित्य आहे.

शासनाकडून मिळालेल्या या मदतीबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या, ‘माझ्या नात्यातलं जवळ कुणीच नाही. शासनाकडून अशा काळात मिळालेली ही मदत माझ्यासाठी फार मोठी आहे, लाख लाख धन्यवाद… 

शासनाकडून मिळालेली ही मदत त्यांच्यासाठी सध्याच्या घडीला लाख मोलाची ठरत आहे.

                                                                       अंजु निमसरकर,  माहिती अधिकारी

Most Popular

To Top