महाराष्ट्र

महावीर जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा; घरातच पूजा, प्रार्थना करण्याचे आवाहन

मुंबई, दि. 5 :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भगवान महावीर जयंतीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान महावीरांनी अखिल विश्वाला मानवतेच्या कल्याणाचा विचार दिला. प्राणीमात्रांवर प्रेम, दया करायला शिकवलं. शांतता, अहिंसा, बंधुत्वाच्या माध्यमातून या जगाचं कल्याण होऊ शकतं हा त्यांचा विचार आपण सर्वानी आचरणात आणला पाहिजे, असे उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

राज्यावरील कोरोनाचं संकट लक्षात घेऊन यावर्षी नागरिकांनी महावीर जयंतीला घराबाहेर पडू नये. आपापल्या घरातच पूजा-अर्चा, प्रार्थना करावी, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी  केलं आहे.

Most Popular

To Top