महाराष्ट्र

जिल्हानिहाय व संस्थानिहाय कोविड-19 निदान व तपासणी प्रयोगशाळा जाहीर


मुंबई, दि. 6 : राज्यातील जिल्हानिहाय व संस्थानिहाय कोविड-19 निदान व तपासणी प्रयोगशाळा यादी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी जाहीर केली आहे. ही यादी पुढीलप्रमाणे 

 1. मुंबई महानगर महापालिकेकरिता – प्रयोगशाळा- कस्तुरबा रुग्णालय, मुंबई आणि केईएम रुग्णालय, परळ, मुंबई.

 2. ठाणे जिल्ह्याकरिता – रायगड, ठाणे महानगरपालिका, कल्याण डोबिंवली महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका, प्रयोगशाळा – ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जी. समूह रुग्णालय, भायखळा, मुंबई

3. पालघर जिल्ह्याकरिता – उल्हासनगर महानगरपालिका, मिरा-भाईंदर महानगरपालिका, भिवंडी- महानगरपालिका, वसई-विरार महानगरपालिका, अंबरनाथ नगरपालिका बदलापूर नगरपालिका. प्रयोगशाळा-  हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था, परळ, मुंबई

 4.  सातारा जिल्ह्याकरिता – प्रयोगशाळा- बै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे

 5. पुणे जिल्ह्याकरिता – प्रयोगशाळा- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, पुणे

 6. अहमदनगर जिल्ह्याकरिता व  नाशिक (मालेगाव, सटाणा तालुका वगळून) – प्रयोगशाळा- आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज, पुणे

 7. कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्याकरिता –  प्रयोगशाळा – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज, जि.सांगली

 8. सोलापूर, लातूर, उस्मानाबाद –  या जिल्ह्याकरिता –  प्रयोगशाळा – डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय  वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर

9. धुळे, जळगाव, नंदुरबार,  नाशिक (मालेगाव व सटाणा तालुका) या जिल्ह्याकरिता –  प्रयोगशाळा –   

श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे

10. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड,  बीड या जिल्ह्याकरिता –  प्रयोगशाळा – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद

11. अकोला, अमरावती, बुलढाणा , वाशिम, यवतमाळ – या जिल्ह्याकरिता –  प्रयोगशाळा – ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नागपूर

12.  नागपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, भंडारा – या जिल्ह्याकरिता –  प्रयोगशाळा – इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर.

000

Most Popular

To Top