महाराष्ट्र

‘गुड फ्रायडे’ ला घरीच प्रार्थना-स्मरण करुन भगवान येशूंची शिकवण आचरणात आणण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

         

मुंबई दि. 9 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुडफ्रायडेच्या निमित्तानं भगवान येशू ख्रिस्तांच्या प्रेम, त्याग, सेवाकार्याचं स्मरण केलं असून भगवान येशूंची मानवकल्याणाची शिकवण आचरणात आणावी. कोरानाचं संकट लक्षात घेऊन गुडफ्रायडेला घराबाहेर न पडता, घरीच प्रार्थना करावी, घरातच राहा, सुरक्षित राहा, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

गुडफ्रायडेच्या निमित्तानं भगवान येशूंच्या प्रेम, त्याग, दया, क्षमा, शांतीसारख्या उदात्त विचारांचं, मानवसेवेच्या कार्याचं स्मरण करण्याची आवश्यकता उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री संदेशात म्हणतात, मानवजातीच्या कल्याणासाठी भगवान येशूंनी प्राणांचं बलिदान दिलं. त्यांनी केलेला त्याग आणि दिलेले विचार मानवजातीचं सदैव कल्याण करत राहतील. आज कोरोनामुळे मानवजात संकटात असताना भगवान येशूंचा विचार, सेवाकार्याचा संदेशच आपल्याला वाचवणार आहे. कोरोनाच्या संकटापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकानं घरातच थांबावं आणि कुणीही घराबाहेर पडू नये, असंही आवाहन त्यांनी केलं आहे.

Most Popular

To Top