आज राज्यात ३५२ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्णसंख्या २३३४
आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई, दि. १३: राज्यात आज कोरोनाच्या ३५२ नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या २३३४ झाली आहे. कोरोनाबाधित २२९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात १९४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४३ हजार १९९ नमुन्यांपैकी ३९ हजार ८९ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २३३४ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
आज राज्यात ११ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी मुंबईचे ९ आणि पिंपरी चिंचवड तसेच मीरा भाईंदर येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे.
आज झालेल्या मृत्यूंपैकी ४ पुरुष तर ७ महिला आहेत. ६ जण हे ६० वर्षांवरील आहेत ५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या ११ जणांपैकी ८ रुग्णांमध्ये ( ७३ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १६० झाली आहे.
आज राज्यातून २२९ कोविड १९ रुग्णांना ते बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.
निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशीदीत मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे. यातील ७५५ रुग्णांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली असून राज्यात या व्यक्तींपैकी ५० जण करोना बाधित आढळले आहेत. यापैकी लातूरमध्ये ८, यवतमाळ येथे ७, बुलढाणा जिल्ह्यात ६ , मुंबईत १४ तर प्रत्येकी २ जण पुणे ,पिंपरी चिंचवड, नागपूर मनपा आणि अहमदनगर भागातील आहेत तर प्रत्येकी एक जण रत्नागिरी, नागपूर, हिंगोली, जळगाव, उस्मानाबाद, कोल्हापूर आणि वाशीम मधील आहेत. याशिवाय या व्यक्तींच्या निकट संपर्कातील ६ जण अहमदनगर येथे तर १ जण पिंपरी चिंचवड येथे करोना बाधित आढळले आहेत.
काल सोलापूरात पहिला करोना बाधित मृत्यू झाल्यानंतर तेथील आरोग्य यंत्रणा युध्दपातळीवर काम करत असून या रुग्णाच्या निवासी परिसरात ३५ हजार लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यासाठी ६२ सर्वेक्षण पथके कार्यरत आहेत. या बाधित रुग्णाच्या अतिजोखमीच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात येत असून आतापर्यंत ७९ निकट सहवासितांना विलग करण्यात आले आहे.
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील
मुंबई महानगरपालिका – १५४० (मृत्यू १०१)
ठाणे – ०६
ठाणे मनपा – ५३ (मृत्यू ०३)
नवी मुंबई मनपा -४६ (मृत्यू ०३)
कल्याण डोंबवली मनपा – ५० (मृत्यू ०२)
उल्हासनगर मनपा- ०१
भिवंडी निजामपूर मनपा – ०१
मीरा भाईंदर मनपा – ४९ (मृत्यू ०२)
पालघर – ०४ (मृत्यू ०१)
वसई विरार मनपा –२६ (मृत्यू ०३)
रायगड –०५
पनवेल मनपा –९ (मृत्यू ०१)
ठाणे मंडळ एकूण –१७१९(मृत्यू ११६)
नाशिक – ०३
नाशिक मनपा – ०१
मालेगाव मनपा – २९ (मृत्यू ०२)
अहमदनगर – ११
अहमदनगर मनपा – १६
धुळे – ०२ (मृत्यू ०१)
धुळे मनपा – ००
जळगाव – ०१
जळगाव मनपा – ०१ (मृत्यू ०१)
नंदूरबार – ००
नाशिक मंडळ एकूण – ६४ (मृत्यू ०४)
पुणे – ०७
पुणे मनपा – २७२ (मृत्यू ३०)
पिंपरी चिंचवड मनपा – २९
सोलापूर – ००
सोलापूर मनपा – ०१ (मृत्यु ०१)
सातारा – ०६ (मृत्यू ०२)
पुणे मंडळ एकूण – ३१५ (मृत्यू ३४)
कोल्हापूर – ०१
कोल्हापूर मनपा – ०५
सांगली – २६
सांगली मि., कु., मनपा – ००
सिंधुदुर्ग – ०१
रत्नागिरी – ०५ (मृत्यू ०१)
कोल्हापूर मंडळ एकूण – ३८(मृत्यू ०१)
औरंगाबाद – ०३
औरंगाबाद मनपा – २० (मृत्यू ०१)
जालना – ०१
हिंगोली – ०१
परभणी – ००
परभणी मनपा – ००
औरंगाबाद मंडळ एकूण – २५(मृत्यू ०१)
लातूर – ००
लातूर मनपा – ०८
उस्मानाबाद – ०४
बीड – ०१
नांदेड – ००
नांदेड मनपा – ००
लातूर मंडळ एकूण – १३
अकोला – ००
अकोला मनपा – १२
अमरावती – ००
अमरावती मनपा – ०५ (मृत्यू ०१)
यवतमाळ – ०५
बुलढाणा – १७ (मृत्यू ०१)
वाशिम – ०१
अकोला मंडळ एकूण – ४० (मृत्यू ०२)
नागपूर – ०१
नागपूर मनपा – ३८ (मृत्यू ०१)
वर्धा – ००
भंडारा – ००
गोंदिया – ०१
चंद्रपूर – ००
चंद्रपूर मनपा – ००
गडचिरोली – ००
नागपूर मंडळ एकूण – ४०(मृत्यू ०१)
इतर राज्ये – ९ (मृत्यू ०१)
एकूण – २३३४ (मृत्यू१६०)
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात आज एकूण ४२२३ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी १५.९३ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.
अजय जाधव १३.४.२०२०