मुख्य बातम्या

कडक शिस्तीचा एक कर्तव्यकठोर नेता,अन्‌ तेवढाच संवेदनशील माणूस म्हणजेच लोकप्रिय कार्यसम्राट आमदार ॲड् श्री अशोक रावसाहेब पवार…

कडक शिस्तीचा एक कर्तव्यकठोर नेता,अन्‌ तेवढाच संवेदनशील माणूस म्हणजेच लोकप्रिय कार्यसम्राट आमदार ॲड् श्री अशोक रावसाहेब पवार…

उसाने गच्च भरलेली बैलगाडी रस्त्याकडेच्या खड्ड्यात कलल्याने ऊसतोड मजुराची चाललेली घालमेल बैलांनी गाडी पूर्ण ताकदीनिशी ओढावी म्हणून त्याचा पत्नीसह चाललेला धावपळ बैलांची होत असलेली ओढाताण आणि प्रसंगी गाडीवानाकडून बैलांना होत असलेली मारहाण.तेवढ्यात एक मोटार तेथे करकचून थांबते अन्‌ गाडीतून उतरलेले कडक कपड्यातील नेते प्रथम बैलांना मारणाऱ्या गाडीवानाला झापडतात अन्‌ वस्तुस्थिती कळल्यावर केवळ बघ्याची भूमिका न घेता थेट खड्ड्यात जाणाऱ्या उसाच्या गाडीला बाहेर खेचण्यासही ते बाह्या सरसावतात…!

कडक शिस्तीचा एक कर्तव्यकठोर नेता अन्‌ तेवढाच संवेदनशील माणूस लोकप्रिय आमदार ऍड. अशोक पवार यांच्या रूपाने न्हावरे – निमोणे रस्त्यावरून जाणारा – येणारांना अनुभवास आला रावसाहेबदादा पवार घोडगंगा साखर कारखान्यावर ऊस घेऊन जाणाऱ्या ऊसतोड मजूर व गाडीवानाकडून बैलांना होत असलेली मारहाण सहन न झाल्याने संतप्त झालेल्या पवारांनी सुरवातीला गाडीवानावर बाह्या सरसावल्या खऱ्या पण बैलगाडी उरळत असल्याने होणारी त्याची ससेहोलपट पाहून त्याच बाह्या सरसावून थेट त्यांच्या मदतीसाठी गाडी ढकलून खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी आमदार अशोक पवार यांनी सर्वतोपरी मदत केली.

निमोणे रस्त्यावरून जाणाऱ्या येणारांनी आज सकाळी हा वेगळाच ‘चेअरमन’ अनुभवला. राष्ट्रवादी सोशल मिडीयाचे उल्लेखनीय काम करणाऱ्या अजय हिंगे या कार्यकर्त्याला भेटण्यासाठी आमदार पवार हे पत्नी सुजाता पवार, पंचायत समितीच्या सभापती मोनिका हरगुडे यांच्यासह जात असताना उसाने गच्च भरलेली एक बैलगाडी मागील बाजूला कललेली व गाडीवान बैलाला मारत असल्याचे पाहून ते थांबले. बैलांना होणारी मारहाण पाहून संतप्त झालेले पवार त्या गाडीवानावर धावून गेले खरे; पण गाडीवान व त्याच्या पत्नीने गाडी मागे उरळल्याने कधीही उलटू शकते असे सांगितल्यावर त्यांच्या रागाचा पारा उतरला व लगेच बाह्या सरसावून ते गाडीच्या मागील बाजूने थेट खड्ड्यात उतरले. आमदार पवार यांचे सहायक प्रदीप जाधवही त्यांच्या मदतीला धावले.

कारखान्याचा चेअरमनच उसाने भरलेली गाडी ढकलून बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पाहून जाणारे(येणारे क्षणभर थबकले. त्यातील काहींनी मदतीसाठी धाव घेतली व एकीच्या बळापुढे खड्ड्यात गेलेली उसाने भरलेली बैलगाडी काही मिनीटांतच मुख्य रस्त्यावर येऊ शकली. गाडीवान व त्याच्या पत्नीने आमदार पवार यांचे या उपकाराबद्दल आभार मानले आणि गाडी कारखान्याच्या दिशेने रवाना झाली.

गाडीवान बैलाला मारत असल्याचे पाहून त्याचा राग आला म्हणून आम्ही थांबलो पण नंतर त्याची अडचण लक्षात आली. गाडी खड्ड्यात गेल्याने कधीही उलटून दुर्घटना घडली असती. कारण उसाच्या उंच लोडच्या वर त्याची पत्नी होती. माणुसकीच्या नात्याने त्याला मदत केली. बाकी विशेष काही केले असे वाटत नाही, अशी प्रतिक्रिया या प्रकारानंतर आमदार ऍड. अशोक पवार यांनी दिली.

Most Popular

To Top