By
Posted on
बुलडाण्यात खामगांव तालुक्यातील माटरगांवमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं कर्जमुक्ती मेळावा घेण्यात आला. या मेळावा दरम्यान राजू शेट्टी यांनी भाजपचा समाचार घेतला.
उद्योगपतीचे कर्ज माफ करणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणे शक्य नसून आता कर्जमुक्तीसाठी स्वाभिमानी लाखो शेतकऱ्यांसह कोर्टात जाणार आहे. शेतकऱ्यांचा विरोध कुणी करत असेल तर त्यांची जागा येत्या निवडणुकीत आम्ही दाखवून देऊ, अशी धमकी राजू शेट्टी सरकारला दिली.
