मुख्य बातम्या

आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी: डॉ. योगेश भैय्या क्षीरसागर यांचा गौरव

आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी: डॉ. योगेश भैय्या क्षीरसागर यांचा गौरव

बीड : आज स्वातंत्र्य दिनानिमित्त वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हाभरातून 3 हॉस्पिटल्सची निवड करण्यात आली. यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जण आरोग्य योजना व प्रधानमंत्री जण आरोग्य योजना अंतर्गत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल *सौ. केशरबाई क्षीरसागर हॉस्पिटल व त्यांच्या सहकाऱ्यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांचा गौरव करण्यात आला.

याप्रसंगी हॉस्पिटलचे डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांना प्रशस्ती प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले.

या योजनेअंतर्गत सौ. केशरबाई क्षीरसागर हॉस्पिटलने 2018 च्या डिसेंबर महिन्यापासून ते आजतायगत 2900 मोफत शस्त्रक्रिया करून रुग्णांना मोठ्या प्रमाणात दिलासा देण्याचे काम केले आहे. या कार्याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने स्वातंत्र्य दिनी डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांचा गौरव केला आहे. यावेळी जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा,जिल्हा पोलिस अधिक्षक रामास्वामी जिल्हाशल्यचिकित्सक डॉ साबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांनी सौ. के.एस.के.हॉस्पिटलच्या सर्व टीमचे आभार मानले आहेत.

Most Popular

To Top