मुख्य बातम्या

केंद्रीय मंत्री डॉ.भागवत कराड यांचा अपमान करणे महागात पडणार, माथेफिरू तरुणा विरोधात पुण्यात ज्ञानेश्वर बडे या तरुणांकडून गुन्हा दाखल 

केंद्रीय मंत्री डॉ.भागवत कराड यांचा अपमान करणे महागात पडणार, माथेफिरू तरुणा विरोधात पुण्यात ज्ञानेश्वर बडे या तरुणांकडून गुन्हा दाखल

पुणे | केंद्रीय मंत्री डॉ.भागवत कराड यांचा अपमान करणे महागात पडणार, माथेफिरू तरुणा विरोधात पुण्यात ज्ञानेश्वर बडे या तरुणांकडून गुन्हा दाखल. डॉ.कराड यांना “भाग्या” म्हणत त्याच्या विरुद्ध अपणास्पदक खोटी माहिती पसरून त्यांची टिंगल टवाळी केली होती.

एका तरुणाने बड्या नेत्यांबद्दल बदनामीकारक पोस्ट शेअर केल्या आहेत. तरुणाने केलेल्या पोस्टवरुन एकाने त्याच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. या तरुणाने अनेक नेत्यांबद्दल अश्लील मजकूर पोस्ट केल्या आहेत. संबंधित तरुणाचे नाव राहुल मुळे असं आहे.

ज्ञानेश्वर बडे एम.बी.ए. झालेल्या उच्चशिक्षीत तरुणाने राहुल मुळेविरुद्ध फिर्याद नोंदवली आहे. राहुलने त्याच्या फेसबुकवरुन धनंजय मुंडे-करुणा शर्मा तसेच राष्ट्रवादी-काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत, भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, अशा अनेक नेत्यांबाबत बदनामीकारक पोस्ट शेअर केल्या आहेत.

राहुलने केलेल्या पोस्टमध्ये त्याने अश्लील तसेच घाणेरड्या शब्दात लिहलं आहे. मराठा समाजाच्या लोकांच्या भावना दुखावून दोन समाजात द्वेश निर्माण करण्यासारख्या राहुच्या पोस्ट आहेत. यावेळी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा शर्मा यांच्या नावांचे संदर्भ घेऊन इतर महिलांबाबत बदनामीकारक पोस्ट शेअर केल्या आहेत.

दरम्यान, राहुल याने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत, भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, अशा अनेक नेत्यांबद्दल बदनामीकारक पोस्ट केल्या आहेत.

Most Popular

To Top