मुख्य बातम्या

धनगरांचे ७८ आमदार! भंडारा लावून बंड करायची हीच ती वेळ : हर्षद शेजाळ

धनगरांचे ७८ आमदार! भंडारा लावून बंड करायची हीच ती वेळ : हर्षद शेजाळ

पुणे : जिंकण्याची सर्व शक्यता असतानाही दारुन पराभव झाला तर त्याला पानिपत होणे म्हणतात. ओबीसी राजकारणात याला ‘जत होणे’ म्हणले पाहिजे. एकहाती आमदार निवडूण आणायची ताकद असलेल्या मतदार संघातही धनगर आमदार निवडूण आणू शकत नसतील तर इतर ओबीसींनी प्रतिनिधीत्त्वाची प्रेरणा घ्यायची कुठून?

अनिल गोटेंसारखा माणूस २५० किलोमीटर अंतरावरुन धुळ्यात जातो आणि तिथं आमदार होतो. इथं आम्हाला जत, फलटण, वाई, माण- खटाव, मंगळवेढा- पंढरपूरसह ७८ मतदारसंघात निवडून येणं दूर, आपलं अस्तित्त्व ही सिद्ध करता येत नाही.

सोशल मिडीयावर समाजतल्याच नेत्यांचे पाय ओढून साध्य काहीच होणार नाही. यापेक्षा या ७८ मतदारसंघातली ध्येय धोरणं ठरवून व्यवस्थित काम केलं तर आमदारांची संख्या वाढेल. एमआयडीसीची नोकरी करुन समाजकार्य करण्यापेक्षा आमदारांकडून कॉंट्रेक्ट घेऊन समाजाची काम करणं जास्त सोप्प होईल. नाहीतर आजवर अंबील पाजून धनगरांना मोकळ्या हातानं घरी पाठवण्याची कला प्रस्थापित्यांना आधीपासूनच अवगत आहे.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सोडवल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका घेण्याचे न्यायालयाने सरकारला आदेश दिलेत. त्यामुळं धनरांच्या जिंदगीची जिल्हापरिषद ही होणार नाहीये. भंडारा लावून बंड करायची हीच ती वेळ!

फोटो साभार- Kalyan Varma

Most Popular

To Top