मुख्य बातम्या

शेतकरी आंदोलनाच्या यशाने हा देश आजही महात्मा गांधी आणि भगतसिंगांचाच आहे हे सिद्ध झालं- पुजा मोरे

शेतकरी आंदोलनाच्या यशाने हा देश आजही महात्मा गांधी आणि भगतसिंगांचाच आहे हे सिद्ध झालं- पुजा मोरे

दिल्ली येथील आंदोलनाला आज यश आले. आणि केंद्र सरकारला तीन काळे कृषी कानून मागे घ्यावे लागले.

या आंदोलनाची मी स्वतः साक्षीदार राहिले आहे.कारण महाराष्ट्रातील शेतकऱ्याची मुलगी या नात्याने मी या आंदोलनात 15 दिवस सहभागी झाले होते.ऊन-वारा- पाऊस-थंडी याची परवा न करता हे शेतकरी लढताना मी डोळ्याने पाहिलं आहे. त्यावेळेसच तेथील शेतकऱ्यांचा निर्धार, एकजूट आणि उत्साह बघून एक न एक दिवस केंद्र सरकारला हे कायदे मागे घ्यावे लागतील असा विश्वास निर्माण झाला होता.

हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी व दडपण्यासाठी अनेक राजकीय पक्ष व संघटनांनी प्रयत्न केले. यात फूट पडावी म्हणून दबावतंत्राचा वापर केला. परंतु या शेतकऱ्यांनी कशाला ही बळी न पडता आंदोलन यशस्वी केले. खर तर भारताच्या स्वातंत्र्याच्या लढाईनंतरची ही शेतकऱ्याच्या आर्थिक स्वातंत्र्याची लढाई होती आणि त्यात शेतकऱ्यांचा विजय झाला. या विजयाने जगाला पुन्हा भारताच्या लोकशाहीचे दर्शन घडवले.

दुःख याच आहे की, या आंदोलनात निष्पाप बांधवांना आपले प्राण गमवावे लागले. त्यांच्या त्यागासमोर मी नतमस्तक होते.

तसेच या आंदोलनात शेतकऱ्यांसोबत माता- भगिनी सुद्धा खांद्याला खांदा देऊन लढल्या आणि त्यामुळे आज इतिहास घडला. ज्या इतिहासाची दखल या जगाला घ्यावी लागली आणि हा देश आजही महात्मा गांधी आणि भगतसिंगांचाच आहे हे सिद्ध झालं.

Most Popular

To Top