आपल्या पृथ्वीला सर्वात जवळचा असलेला चंद्र आपण रोज बघतो, चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही, सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडून तो पृथ्वीकडे परावर्तित होतो तो आपल्याला दिसतो.
हा सूर्याचा प्रकाश पृथ्वीकडे ज्यादिवशी सर्वात जास्त परावर्तित होतो ती रात्र म्हणजे पौर्णिमा जेव्हा आपण पूर्ण चंद्र दिसला असे म्हणतो आणि या उलट जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मधल्या कक्षेत येतो तेव्हा सूर्याचा परावर्तित होणार प्रकाश सर्वात कमी असतो त्याला आपण अमावस्या असे म्हणतो. मधल्या सर्व अवस्था केले कलेने चंद्राचा परावर्तित होणारा प्रकाश कोन बदलताना आपल्याला दिसतात.
चंद्र आपल्याला पांढऱ्या रंगाचा दिसतो आणि त्याचा काही भाग आपल्याला राखाडी गडद रंगाचा दिसतो ज्याला आपण चंद्रावरचे डाग समजतो.
परंतू दुर्बिणीतून पाहिल्यास आपल्याला समजते की चंद्रावर अनेक विविध प्रकारचे खड्डे टेकड्या, पर्वत , दऱ्या आहेत.
जो राखाडी भाग आपण बघतो ते प्रत्यक्षात विस्तीर्ण पसरलेले मैदानी प्रदेश आहेत.
फोटोग्राफी च्या माध्यमातून आपण याबद्दल आणखी माहिती मिळवू शकतो.
जे मैदानी प्रदेश चंद्रावर आहेत तिथली माती वैशिष्ट्यपूर्ण आहे. लोह, टायटेनिअम , सिलिका अशा विविध खनिजांची तीथली माती बनलेली आहे ज्यावर सूर्याचा प्रकाश पडून विविध रंग दिसतात.
लालसर पिवळ्या भागातली माती ही गंज असलेले लोहकण यांनी बनलेली आहे.
निळसर राखाडी रंगाची दिसणारी माती ही टायटेनिअम ऑक्साईड ने बनलेली आहे.
जो भाग आपल्याला खूप चमकणारा पांढऱ्या रंगाचे धब्बे असणारा दिसतो तिथे सिलिका धूलिकण जास्त प्रमाणात आहेत ज्यावरून सूर्याचा प्रकाश सर्वात जास्त परावर्तित होतो.
असा रंगीबेरंगी चंद्र आपल्याला त्याची एकच बाजू दाखवतो, याचे कारण चंद्राची पृथ्वी भोवती फिरण्याची कक्षा ही अशा प्रकारे स्थिर आहे की चंद्र स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करायला जितका काळ घेतो तितकाच त्याला पृथ्वी भोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागतो. याला टायडली लॉक ऑर्बिट म्हणतात.
म्हणून आपल्याला चंद्राची नेहेमी एकच बाजू दिसते, अंतराळयान चंद्राच्या कक्षेत उपग्रह मार्फत घेतलेल्या फोटो मुळेच चंद्राची दुसरी बाजू आपल्याला समजली जी आपल्याला पृथ्वीवरून दिसू शकत नाही.
असा हा आपला चंद्र लाखो वर्षांपासून आपल्या रात्रीच्या आकाशात प्रकाश देत आहे.
अशाच अनेक माहिती साठी पेज लाईक करा, पोस्ट शेअर करा.
तुम्हाला अवकाशासंबंधी (Space/Astronomy) अजून काय जाणून घ्यायची इच्छा आहे याबद्दल कमेंट करा.