महासत्ता : आपण अनेक वेळा तेलंगणा मॉडेलची चर्चा ऐकली असेल.आणि हे तेच तेलंगणा मॉडेल आहे,ज्या सरकारने शेतकऱ्यांची आज संपूर्ण कर्ज माफी केली आहे.त्याच बरोबर शेतकऱ्यांना मोफत वीज, मोफत पाणी, एक्करी दहा हजार रु अनुदान देणारे हे राज्य आहे.अशा प्रकारच्या शेकडो योजना तेलंगणा सरकार राबवते.अत्यंत अल्पावधीत तेलंगणा राज्याचा बदलेला चेहरा मोहरा आता देशाला दिशादर्शक ठरताना दिसत आहे.
केसीआर साहेबांचे अचूक नियोजन,प्रचंड मोठी राजकीय इच्छाशक्ती आणि अहोरात्र मेहनत या त्रिसूत्रीने तेलंगणा राज्याचे नंदनवन झाले आहे.तिथला शेतकरी,कष्टकरी,आणि सामान्य लोकांच्या जीवनात एक नवी क्रांती आली आहे.आता महाराष्ट्रासह देशात देखील केसीआर साहेबांसारख्या खंबीर नेतृत्वाची गरज निर्माण झाली आहे.महाराष्ट्र आणि देश नक्कीच अशा उतुंग नेतृत्वाखाली प्रगती करेन असा विश्वास आहे.