संस्कार शाळेने मिळविले तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम पारितोषि
परळी (प्रतिनिधी) : शहरातील पद्मावती शिक्षण संस्था संचलित, संस्कार प्राथमिक शाळेतील इयत्ता सहावीचा विद्यार्थी चि. अर्णव चंद्रकांत शेजूळ याने चौदा वर्ष वयोगटाखालील 35 किलो वजन गटातून तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळवून संस्कार शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. व त्याची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
त्याने मिळवलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. संस्थेचे सचिव दीपक तांदळे सर यांनी संस्थेच्या वतीने त्याचा व त्याच्या पालकांचा सत्कार केला.
या त्याच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. कैलास तांदळे सर, सचिव श्री. दीपक तांदळे सर , मुख्याध्यापिका मधुरी तांदळे मॅडम , प्र. मुख्याध्यापक श्री. गायकवाड सर, पर्यवेक्षक श्री. इंगळे सर, सर्व शिक्षक , शिक्षिका , शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक यांनी त्याचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.