माझा जिल्हा

फोर्ज’च्या अकाऊंटंटची आत्महत्या, चिठ्ठीत कंपनी मालकाचं नाव

फोर्ज'च्या अकाऊंटंटची आत्महत्या, चिठ्ठीत कंपनी मालकाचं नाव

पिंपरी चिंचवड : फोर्ज कंपनीतील अकाऊंटंट निलेश गायकवाडने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. चाकणमधील एका हॉटेलमध्ये विष प्राशन करुन त्याने आयुष्य संपवलं. निलेशने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये ‘फोर्ज’ कंपनीचे मालक अमित कल्याणी यांचं नाव आहे.

चाकण येथील गंधर्व हॉटेल मध्ये निलेश तीन दिवसापासून रहायला आला होता. मात्र दोन दिवसांपासून त्याने दरवाजा न उघडल्यामुळे हॉटेल व्यवस्थापनाला संशय आला. त्यानंतर निलेशने रुममध्येच आत्महत्या केल्याचं समोर आलं.

आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत ‘फोर्ज’ कंपनीचे मालक अमित कल्याणी यांचं नाव आहे. अमित कल्याणी यांना एका व्यवहारासाठी निलेशने 15 कोटी रुपये घेऊन दिले होते. त्यापैकी साडे अकरा कोटी रुपये
अमित यांनी परत केले. मात्र उर्वरित रक्कम आणि निलेशचे 60 लाखाचे कमिशन देण्यास अमित टाळाटाळ करत होते.

तर दुसरीकडे 15 कोटी रुपये देणारी संबंधित व्यक्ती निलेशच्या मागे पैशासाठी तगादा लावून बसली होती. यातच त्याने टोकाचं पाऊल उचललं. चाकण पोलिस अधिक तपास करत आहेत.

सुसाईड नोटमधील अखेरचा भाग

सर्वांना सांभाळ, मी तुझ्याबरोबर सदैव असेन आणि मला माफ कर, तुझ्यासोबत जास्त काळ थांबू शकलो नाही.
कृपा करुन या सर्व घटनेला आणि कृत्याला माझ्या बायकोला, आईला, पप्पाना आणि घरच्यांना जबाबदार धरु नये. आणि कल्याणी साहेबानी जर रुपये दिले तर त्यांना सोडून द्या.

तुमचा, निलेश

फोर्ज’च्या अकाऊंटंटची आत्महत्या, चिठ्ठीत कंपनी मालकाचं नाव
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top