मुख्य बातम्या

धनंजय मुंडे जेव्हा क्रिकेट च्या मैदानात उतरतात!

आपल्या जबरदस्त व अभ्यासपूर्ण भाषणशैलीने सभागृह दणाणून सोडणारे व सत्ताधाऱ्यांना सभागृह सोडून जाण्यास भाग पाडणारे धनंजय मुंडे जेव्हा क्रिकेट च्या मैदानात उतरतात!

 

परळी : विधानपरिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे हे आपल्या आक्रमक, अभ्यासपूर्ण व अत्यन्त प्रभावी भाषणशैलीमुळे सतत चर्चेत असतात. सभागृहातील त्यांची अनेक भाषणे सबंध महाराष्ट्राने ऐकली आहेत. अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने आपले विषय मांडणारे विरोधीपक्षनेते खूप कमी कालावधीमध्ये राज्यभर प्रसिद्ध झाले आहेत.
त्यांच्या व्यक्तिमत्वाचा दुसरा पैलू म्हणजे समाजकारण व क्रीडा क्षेत्रात विशेष व उल्लेखनीय कार्य!

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त, धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान च्या माध्यमातून सरपंच चषक या दिवसरात्र क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने नेहमी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर चौफेर फटकेबाजी करणारे धनंजय मुंडे आज चक्क क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी करताना दिसले!

शालेय जीवनापासूनच क्रिकेटची विशेष आवड असलेल्या मुंडे यांनी यापूर्वीपण ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केलेले आहे. तसेच अनेकवेळा एका संघाच्या माध्यमातून यशस्वी फलंदाजीसुद्धा केलेली आहे.

 

आजही धनंजय मुंडे यांनी परळी येथील नगरसेवक 11 विरुद्ध जिल्हा परिषद सदस्य 11 या सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी केली व संघाला विजय मिळवून देत नाबाद राहिले. त्यांच्या स्वतः सहभाग पाहून कार्यकर्ते व परळीतील नागरिकांनी गर्दी केली होती.

धनंजय मुंडे जेव्हा क्रिकेट च्या मैदानात उतरतात!
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top