औरंगाबादमध्ये शहाच्या पकोडा सेंटरमध्ये धनंजय मुंडेनी तळली भजी
औरंगाबाद दि 1 – राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे सिडकोतील हॉटेल रामा इंटरनॅशनलच्या मागे “अमित शाह पकोडा सेंटर’ सुरु करण्यात आले आहे. रविवारी (ता.11) विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भेट दिले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या व्यक्तव्याचा भजे तळून निषेध व्यक्त केला.
औरंगाबाद : राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे सिडकोतील हॉटेल रामा इंटरनॅशनलच्या मागे “अमित शाह पकोडा सेंटर’ सुरु करण्यात आले आहे. रविवारी (ता.11) विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भेट दिले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या व्यक्तव्याचा भजे तळून निषेध व्यक्त केला.
नरेंद्र मोदी सरकारने सत्तेवर आल्यानंतर सहा कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात लाखावरही रोजगार दिला नाही. यामुळे हेच बेरोजगार आता सरकारला त्यांची जागा दाखवतील. अमित शहा यांनी बेरोजगार तरुणांचा अपमान केला आहे. या सरकार मध्ये केवळ अमित शहा यांचा मुलगा जय शहालाच रोजगार मिळाला असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.
अमित शाह यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे नऊ फेब्रुवारीला सिडकोत अमित शहा पकोडा सेंटर सुरु करण्यात आले. याच सेंटरला रविवारी विरोधीपक्ष नेते धनंजय मुुंडे यांनी भेट दिली. अभिजित देशमुख, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष दत्ता भांगे, रहिम पटेल, बाळु औताडे, श्री.येडे पाटील यावेळी उपस्थित होते.