महाराष्ट्र

शर्मा कम्पनी म्हणजे हनी ट्रॅप रचून खंडणी उकळणारी टोळी?

धनंजय मुंडेंवर खोटे आटोप करणा-या रेणू शर्माचे अनेक कारनामे उघड

भाजप नेते कृष्णा हेगडे यांची हनी ट्रॅप प्रकरणी पोलिसात तक्रार

मनसे नेते मनीष धुरी यांच्यावरही टाकले होते जाळे, रिझवान कुरेशी नामक व्यक्तीलाही छळल्याची माहिती उघड

शर्मा कम्पनी म्हणजे हनी ट्रॅप रचून खंडणी उकळणारी टोळी?

मुंबई (प्रतिनिधी) :- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना ब्लॅकमेल करत बलात्कार केल्याचा खोटा आरोप केलेल्या रेणू शर्मा नामक महिलेचे आज (गुरुवारी) बरेच कारनामे उघड झाले आहेत. भाजप नेते माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी सदर महिलेने हनी ट्रॅप मध्ये अडकवल्याचा प्रयत्न केल्याची तक्रार मुंबई पोलिसात दाखल केली आहे. अशी आणखी काही प्रकरणे समोर आल्याने शर्मा कंपनी म्हणजे हनी ट्रॅप चालवणारी टोळी तर नाही ना असा संशय आता बळावताना दिसत आहे.

रेणू शर्मा ही आपल्याला 2010 पासून जवळपास 5 वर्ष फोन व मेसेज करून रिलेशनशिपची मागणी करत होती, तिच्यावर गुन्हा दाखल करून चौकशी करावी अशी मागणी कृष्णा हेगडे यांनी दिलेल्या तक्रारीद्वारे केली आहे.

या पाठोपाठ असाच प्रकार मनसे नेते मनीष धुरी यांनाही ही महिला फोन व मेसेजद्वारे रिलेशशिप साठी गळ घालत होती परंतु त्यांनी यातून कशीबशी सुटका करून घेतली असल्याचे स्वतः मनीष धुरी यांनी माध्यमांसमोर उघड केले असून, याबाबत तेही पोलिसात तक्रार दाखल करणार आहेत.

आणखी एका प्रकरणात रेणू शर्मा नामक या महिलेने मे 2018 ते जुलै 2019 दरम्यान सोशल मीडियावरून मैत्री झालेल्या जेट एअरवेज कंपनीतील रिझवान कुरेशी नामक तरुणाला देखील अशाच प्रकारे छळले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

रिझवान यांच्यासोबत आधी मैत्री मग हॉटेलिंग आणि बरेच काही अनेक दिवस घडले त्यानंतर बऱ्याच दिवसानंतर सदर महिलेने रिझवान यांच्या विरुद्ध विनय भंग करत बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार मुंबई पोलिसात दाखल केली.

समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींशी आधी जवळीक साधून नंतर त्यांच्याकडून पैसे उकळायचा व्यवसाय करायचा, काही कारणांनी पैसे देणे बंद झाले तर त्या व्यक्तीवर गुन्हे दाखल करायचे असे प्रकार मोठ्या शहरांमध्ये आजकाल सर्रास घडत असतात. याच प्रकारचे सावज म्हणून मंत्री धनंजय मुंडे, कृष्णा हेगडे, मनीष धुरी, रिझवान कुरेशी यांच्यासह या टोळीचे आणखी किती जण बळी ठरले आहेत याबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगत असल्या तरी ते पोलीस तपासाअंतीच स्पष्ट होऊ शकणार आहे.

Most Popular

To Top