महाराष्ट्र

जीत उतनीही शानदार जीत होगी – धनंजय मुंडे

..जीत उतनीही शानदार जीत होगी – धनंजय मुंडे

परळी दि. १७ (प्रतिनिधी) : राज्याचे लक्ष लागलेल्या परळी विधानसभेच्या लढतीत विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांना पराभूत करण्यासाठी भाजपकडून अमित शहा यांच्यानंतर  पंतप्रधान मोदींना  आले असून तरीही आपणच विजयी होणार असल्याचा विश्वास विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

धनंजय मुंडे यांनी “जितना बडा संघर्ष होगा, उतनीही शानदार जीत होगी…” असे ट्विट करत ( https://twitter.com/dhananjay_munde/status/1184671505805926401?s=19 ) आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आपली लढाई कुठल्याही व्यक्ती विरुद्ध नसून सामान्य माणसाचे वर्षानुवर्षे न सुटलेले प्रश्न सोडवण्यासाठी असल्याचे वारंवार मुंडे यांनी वेळोवेळी सांगितले आहे.

सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी आपला लढा असून या लढाईत आता भाजपने देशाच्या गृहमंत्र्यापाठोपाठ आता शेवटचे अस्त्र नरेंद्र मोदी यांनाही आपल्या विरोधात उतरवले आहे; मला राजकारणातून संपविण्यासाठी एवढ्या शक्ती एकवटल्या असल्या तरी 24 वर्षे सामान्यांसाठी केलेल्या संघर्षातून सामान्य जनता आपल्याच पाठीशी असून, आपणच ‘शानदार’ विजय मिळवू असा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

Most Popular

To Top