मुख्य बातम्या

धनुभाऊ तुम्ही मने आधीच जिंकली; आता मतातूनही जिंकाल- परळीकरांचा सूर

परळीत दुसर्‍या दिवशीही धनंजय मुंडेंच्या विराट रॅली आणि सभेचीच चर्चा

धनुभाऊ तुम्ही मने आधीच जिंकली; आता मतातूनही जिंकाल- परळीकरांचा सूर

परळी दि.04…….परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस व आघाडी मित्र पक्षांचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी निघालेल्या विराट रॅली आणि प्रचंड जाहीर सभेचीच परळी शहरात जोरदार चर्चा आहे. रॅली आणि सभेला मिळालेला प्रतिसाद पाहता धनंजय मुंडे यांनी पहिल्या टप्प्यातच बाजी मारली असून, हा प्रतिसाद आणि जनतेचा उत्साह त्यांच्या विजयात परावर्तीत होईल अशा प्रतिक्रीया जनसामान्यांमध्ये व्यक्त होवू लागल्या आहेत.

विरोधी पक्षात असतानाही आणि विधान परिषदेचे आमदार असतानाही धनंजय मुंडे यांनी मागील काळात परळी मतदारसंघासाठी विकासाच्या बाबतीत मोठे योगदान दिले आहे. जिल्हा परिषदेत 10 वर्ष काम करताना त्यांनी केलेली विकासाची कामे आजही त्यांच्या कामाची साक्ष देतात. नगरपालिका व इतर स्थानिक संस्थांच्या माध्यमातून परळी शहराचे रूप त्यांनी पालटून टाकले आहे. समाजातील प्रत्येक घटकाशी संपर्क, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक क्षेत्रातील त्यांचे काम यामुळे त्यांची नाळ प्रत्येक परळीकर नागरिकांशी जुळली असून, अडी-अडचणीला धावून येणारा माणूस म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. परळी मतदारसंघातील निर्माण झालेल्या या त्यांच्या ऋणानुबंधाच्या संबंधांची प्रचिती कालच्या रॅलीत आणि सभेत पहायला मिळाली.

दुपारी 01 वाजता रॅलीचा शुभारंभ असताना सकाळी 11 वाजल्यापासून शिवाजी चौकात गर्दी होवू लागल्याने ती आझाद चौकापर्यंत लांबत गेली. धनंजय मुंडेंचे आगमन झाल्यानंतर गर्दीचा उत्साह अवर्णणीय होता. शिवाजी चौक ते एक मिनार चौक इथपर्यंत रॅली दिसत होती, चौहीकडे माणसेच माणसे आणि उत्साहच-उत्साह दिसून येत असल्याच्या प्रतिक्रीया अनेक व्यापार्‍यांनी व्यक्त केल्या. रॅलीत त्यांचे ठिक-ठिकाणी झालेले स्वागत, जनतेचे त्यांच्यावरील असलेल्या प्रेमाची साक्ष देत होत्या. रॅली संपण्यापूर्वीच संपूर्ण सभामंडप गर्दीने भरून गेला होता. त्यांच्या भाषणाला उपस्थितांनी प्रतिसाद दिला.

*भाषणानेही मने जिंकली*

या सभेत झालेले धनंजय मुंडे यांचे भाषणही परळीकर जनतेचे मन जिंकणारे ठरले. स्व.पंडीतअण्णा मुंडे, स्व.गोपीनाथरावजी मुंडे यांची आठवण काढताना त्यांनी स्वतःच्या स्वप्नातील मतदारसंघाचे स्वप्न उभे करतानाच भाजपच्या विद्यमान आमदाराच्या मागील निवडणुकीतील वचननाम्याची पोलखोल करणारी बाबही जनतेला चांगलीच पटणारी ठरली. भाजपच्या संकल्प नाम्यातील एकही बाब खरोखरच पूर्ण झालेली नाही की, अशी चर्चा आज परळीच्या चौका-चौकात होताना दिसून येत होती.

—————

Most Popular

To Top