सोशल मीडियावर सामान्य जनतेने भाजपच्या पेड लोकांना दिला धोबीपछाड
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) जशी जशी निवडणूक जवळ येत आहे प्रचाराला जोर यायला सुरुवात झाली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर “परळी विधानसभेसाठी कॅबिनेट मंत्री पाहिजे का विरोधी बाकावर आमदार पाहिजे?” अशा पोस्ट्स फिरवायला सुरुवात केली. त्यांनंतर येथील सुजाण नागरिकांनी भाजपच्या अंधभक्तांवर प्रश्नांची सरबत्ती करून त्यांना त्यांची जागा दाखवून दिली.
या वाकयुद्धात काही लक्षणीय पोस्ट्स पुढीलप्रमाणे आहेत;
◆ मराठा आरक्षणाच्या बैठकीतुन उठून जाणाऱ्या मावळत्या कॅबिनेट मंत्री हवयात कि मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सभागृहात आणि रस्त्यावर आवाज उठवणारा आमदार हवा?
◆ मावळत्या निष्क्रिय कॅबिनेट मंत्र्यापेक्षा कार्यक्षम विरोधी पक्षनेता कधीही चांगला. यंदा आमचं ठरलंय आता परळीत विधानसभा मतदारसंघात फक्त धनंजय मुंडे.
◆ तुमचे मत परळी अंबाजोगाई रस्त्यासाठी झगडणाऱ्या सामान्य नागरिकांवर गुन्हे दाखल करणाऱ्या मावळत्या कॅबिनेट मंत्री हव्यात की जनतेसाठी त्यांच्या खांद्याला खांदा लावून आंदोलन करणारे धनुभाऊ हवेत?
◆ १३ महिने वैद्यनाथ कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचा पगार जाणूनबुजून रोखणाऱ्या मावळत्या कॅबिनेट मंत्री हव्यात की विरोधात राहून काहीशे कोटींचा सोलर प्रोजेक्ट आणून रोजगार निर्मिती करणारे धनंजय मुंडे हवेत?
◆ वर्षानुवर्षे निवडून आलेल्या असताना सातत्याने परळीकरांना दुय्यम स्थान देणाऱ्या मावळत्या कॅबिनेट मंत्री हव्यात की परळीकरांसाठी सत्ता नसतानाही गल्ली ते दिल्ली झटणारे, आपल्या मातीशी ईमान राखणारा नेते, लोकप्रिय आमदार धनंजय मुंडे हवेत?
◆ शासकीय नियम धाब्यावर बसवून शेतकऱ्यांना FRP प्रमाणे ऊस दर नाकारणाऱ्या मुजोर कारखानदार मावळत्या मंत्री हव्यात की शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे नेतृत्व धनंजय मुंडे हवेत?
◆ संविधान बदला म्हणणाऱ्या मावळत्या आमदार हव्यात की “इस देश मे रहना होगा तो जय भीम कहना होगा” म्हणत भिमा कोरेगाव प्रश्नी विधान परिषदेत स्थगन प्रस्ताव आणणारे आमदार हवेत?
◆ तुम्हाला निवडणुकीपुरत परळीत असणाऱ्या मावळत्या आमदार पाहीजेत की सदैव सामान्य जनतेसाठी उपलब्ध असणारे आमदार पाहिजेत.
◆ परळीत कोणताच सांस्कृतिक कार्यक्रम न घेणाऱ्या साहित्य व कलेप्रति अनास्था असणाऱ्या मावळत्या आमदार हव्यात की सातत्याने सोशल इंजिनिअरद्वारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून इथल्या कलाकारांसह जागतिक दर्जाच्या कलाकारांना साथ देणारे आमदार हवेत?
◆ “मी म्हणेल तोच कायदा” असा भाव ठेऊन स्वतःच्या कार्यकर्त्यांना येड्याहो (वेडे) म्हणत हेटाळणी करणाऱ्या मावळत्या आमदार हव्यात की कोणीही सामान्यजन अडचणीत असेल तर खंबीरपणे साथ देणारा आपला माणूस धनंजय मुंडे आमदार हवेत.
अशा अनेक पोस्टस जनतेने उत्स्फूर्तपणे टाकल्या. झाल्या प्रकाराने भाजप कार्यकर्ते चांगलेच भांबावून गेले आहेत. याआधीही स्वतःच “जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री” असे म्हणणाऱ्यांचे सातत्याने भाजपतर्फेच खच्चीकरण झाले आहे. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे मंत्रीपदाचा जेमतेम अर्धा कार्यकाळ झाला असताना अंधभक्तांच्या आणि त्यांच्या नेत्यांच्या उथळ वागण्याने त्यांचे निम्मे मंत्रीपद भाजपने काढून घेतले होते.
या सर्व प्रकारामुळे भाजपचे अंधभक्त चांगलेच तोंडावर पडले असून त्यांनी पोस्ट टाकून अवलक्षण करून घेतले असेच म्हणावे लागेल. आता सुद्धा इतिहासातून काहीच न शिकता असे उथळ वागून भाजप कार्यकर्तेच त्यांच्या नेत्याला पराभूत केल्याशिवाय राहणार नाहीत अशी चर्चा सर्वत्र होत आहे.