महाराष्ट्र

विशेष लेख : महाराष्ट्र कोरोनाशी लढताना विरोधी पक्षाचा गलिच्छ राजकारणाचा दर्प…

विरोधी पक्ष नेते राजभवनाच्या दारात. – कु. प्रियंका जोशी

महासत्ता ऑनलाइन – सध्याची परिस्थिती पाहून जुने दिवस चांगले होते असे लोक म्हणतायेत अस ऐकल… खरं की खोटं कुणास ठाऊक? पण सध्याच्या भाजप पेक्षा पूर्वीची भाजप खूप चांगली होती असं मात्र लोक आवर्जून म्हणतायेत. कारणही तसंच आहे….

संपूर्ण राज्य कोरोनासारख्या आजाराशी दोन हात करत असताना महाराष्ट्रातला विरोधी पक्ष मात्र गलिच्छ राजकारणाच्या चिखलात आपले हात माखतोय. राजकारण सत्तेसाठी नसतं हे एका जागेसाठी राजीनामा देणाऱ्या आदरणीय अटल बिहारी वाजपेयी कडून शिकायला मिळालं होतं, तर राजकारण हे सत्तेसाठीच करायचं असतं हे हल्ली मुक्काम राजभवना मध्ये असणाऱ्या आदरणीय नेत्यानी सिध्द केल. एकाच पक्षांमधील नेत्यांच्या तत्वांमधिल हा विरोधाभास….

आदरणीय उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री होऊन नये म्हणून इतिहासात ही ईतकी कट कारस्थान शिजली नसतील ईतकी कटकारस्थान झाली राज्यघटनेचे उल्लंघन करून काळ्याकुट अंधारात पाप घडले. अखेर कटकारस्थान करणाऱ्यांनाच अजीर्ण झाले. आणि 11 कोटी जनतेच्या आशिर्वादाने आणि 175 आमदाराच्या पाठिंब्याने लाखोच्या जनसमुदायात आदरणीय उध्दव साहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली…

सरकारचा 30 दिवसाच्या कारभार नंतर सरकारने दोन लाखांपर्यंत शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी जाहीर केली. पाच वर्ष माजी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांना जमलं नाही कींवा मग दोन वेळा मतदान करून आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ना ही जमलं नाही. परंतु शेतकऱ्यांच्याची कर्जमाफी केल्याने देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी होईल असे म्हणणाऱ्या आरबीआयने मात्र भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी होउ शकते अश्या कोरोनाच्या परीस्थितीत मेहुल चोकसी सारख्या 50 कर्जबुडव्यांचे 68 हजार 607 कोटीचे कर्ज मात्र कसे काय माफ कले ? नोटबंदी सारखा शेतकऱ्यासाठी त्रासदायक ठरलेला निर्णय घेउन ही कर्जमाफी केंद्राने केली नाही परंतु आदरणीय उध्दव साहेबानी जनतेला हवे ते आणि गरजेचे निर्णय घेतले आणि जनतेच्या मनात असामान्य मुख्यमंत्री म्हणुन स्थान निर्माण केले, खेड्यातल्या पारा पासुन तर शहरातल्या कॅफे-रेस्टॉरंट पर्यंत लोक उध्दव साहेबाच्या कामाचे फार कमी कालावधीत कौतुक करु लागले.

कदाचित याचमुळे विरोधी पक्षाच्या पोटात “कळ” जाण्यास सुरुवात झाली असावी परंतु आता फक्त कळच नाही तर “जळजळ” ही सुरू झालीये कारण आता आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब फक्त मुख्यमंत्री नाही तर कोणासाठी देव कोणासाठी असामन्य नेतृत्त्व तर कोणासाठी आयकाॅन(icon) झाले आहेत. मा.उद्धव साहेब कोरोना सारख्या आजाराच्या परिस्थितीत ज्या पद्धतीने महाराष्ट्र सांभाळत आहेत ते पाहुन टिकाकरणारे लोक ही उध्दव साहेबाचे कौतुक करतायेत. “संकटाशी दोन हात करण्याचे सामर्थ्य असणाऱ्या व्यक्ती पुढेच संकटे येतात” असं म्हणतात प्रत्यक्षात पाहिलाही मिळाले, देवाजवळ कोरोनाच संकट मिटू दे अशी प्रार्थना महाराष्ट्र करत असताना विरोधी पक्ष मात्र उद्धव साहेबांचे मुख्यमंत्रीपद जाऊदे अशी भुनभुन राजभवनात करतायेत. भाजपने फक्त लाटच पाहिली आहे मा. उद्धव साहेबांच्या मुख्यमंत्री पदाला धक्का जरी लागला तर भाजपला वादळ आणि सुनामी महाराष्ट्रात एकत्र पाहिला मिळेल.

2014 साली महाराष्ट्रात भाजपची सत्ता आली व काँग्रेस राष्ट्रवादी विरोधी पक्षाच्या भूमिकेत असताना विरोधी पक्ष महाराष्ट्रत नाही अशी टीका नेहमीच भाजपने केली. आज त्याच महाराष्ट्रातील भाजपला कोरोनाच्या परिस्थितीत कुठे आहे..? हा सवाल जनता विचारतेये…
काय आहे याचं उत्तर भाजपकडे ? राजभवन राज्यपालाना एका निर्णयासाठी चक्क 15 दिवस लागतायेत. आठवणीसाठी स्मरणपत्र पाठवावे लागत आहे. या सगळ्याशी राजभवनात ये-जा करणाऱ्यांचा संबध आहे की नाही हे समजण्या ईतकी जनता समजदार आहे. पण नाही म्हटले तरी राज्यपाल राज्याचे की भाजपचे हा प्रश्न मात्र भेडसावतोच. मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब आमदार कसे होणार नाहीत याची खबरदारी कसली करतायेत उद्धव साहेबांची कामगिरी बघता आणि लोकांचा प्रतिसाद बघता आदरणीय उद्धव साहेब ठाकरे नागपूर दक्षिण पासून तर मा.आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम पर्यंत महाराष्ट्रातल्या कुठल्याही विधानसभेतून निवडून येतील कारण लोकांना उद्धव साहेब आमदार होणार नाहीत या साठी कटकारस्थान करणारे मुख्यमंत्री नकोयेत तर कोरोना पासून जनतेला आणि महाराष्ट्राला वाचवणारे मुख्यमंत्री हवे आहेत.

निळ्या, पिवळ्या, हिरव्या, भगव्या यांच्या पलीकडे जाऊन खाकी वर्दीतला पोलिस आणि पांढऱ्या युनिफॉर्म मधले डॉक्टर देव म्हणून आज काम करतायेत आपणही परिस्थिती पाहून राजकारण केलं असतं तर भाजप च आणि विरोधी नेत्याचे स्थान लोकांच्या मनात वाढले असते पण “बुडत्याचा पाय खोलात” त्याला लोक तरी काय करणार. पहाटे शपथ आटपून नंतर समोरच्या साठी खोदलेल्या खड्यात तर आपण पडलातच गलिच्छ राजकारणाच्या चिखलात बुडवलेले हात सांभाळा नाहीतर चिखलाचे शिंतोडे स्वतःवर नाहीतर एकमेकांवर उडतील.

Most Popular

To Top