महासत्ता- कालपर्यंत चोर-चोर ओरडणारे आता उत्तर देतील का? तावातावाणे बोलणारे आता गप्प का आहेत?, असा प्रश्न विचारत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला धारेवर धरले. तसेच या घोटाळ्यातील आरोपांप्रकरणी गांधी कुटुंबीयांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा प्रकरणावर बोलण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
एकूण तीन कंपन्यांना कंत्राट त्यापैकी ऑगस्टा वेस्टलँड ही एक कंपनी आहे. या कंपनीला कोट्यावधी रुपयांचे कंत्राट देण्यात आलं असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
दरम्यान, अनेक भारतीय नेते आणि लष्करी अधिकाऱ्यांनाही यावेळी लाच दिली गेली. इटलीच्या पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकून माहिती मिळवली आहे. या सौद्यात जवळपास ५२ टक्के कमिशन काँग्रेस नेत्यांना दिले गेले असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
