महाराष्ट्र

मराठा आरक्षणाला स्थगिती द्या – इम्तियाज जलील

महासत्ता-  मराठा आरक्षणाविरोधात एमआयएमने न्यायालयात याचिका दाखल केली. मराठा आरक्षणासंदर्भातील राज्य मागासवर्ग आगोयाचा अहवाल रद्द करावा, तसेच मराठा आरक्षणाला स्थगिती द्या अशी मागणी या याचिकेत दाखल करण्यात आली आहे. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे.

भाजपा, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकसारखेच विषारी असून मराठा आरक्षण हे एक प्रकारचे ‘गाजर’ आहे. मराठा समाज सध्या त्यांची वाहवा करत असला तरी पडद्यामागील सत्य त्यांना लवकरच समजेल, अशी प्रतिक्रियाही इम्तियाज जलील यांनी दिली.

दरम्यान,  मराठा आरक्षण रद्द करून मराठा आणि मुस्लीम समाजाला विभागून आरक्षण देण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. मात्र, जलील यांची ही याचिका न्यायालयात टिकणार नसल्याचे मत मराठा आरक्षणाचे समर्थक आणि अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी व्यक्त केले.

 

Most Popular

To Top