महाराष्ट्र

पवार कुटूंबातील हे 4 सदस्य उतरणार लोकसभेच्या रिंगणात!

मुंबई- पवार कुटुंबातील 4 सदस्य हे लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीची जागावाटपाची चर्चा अंतिम टप्यात आली आहे. याबाबतची माहिती एका वृत्तपत्राने दिली आहे

बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे या बारामतीमधून निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. तर शरद पवार माढा मतदारसंघातून निवडणूक लढण्याबाबत चाचपणी करत आहेत.

अजित पवार हे शिरुरमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तर अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार मावळ मतदारसंघातून नशिब आजमावण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, पवार कुटुंबीयांनी निवडणूक लढवली तर राष्ट्रवादीची ताकद वाढेल आणि जागा जास्त निवडून येतील असा अंदाज राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आहे.

Most Popular

To Top