महासत्ता- आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही पूर्णपणे ४८ जागा लढत आहोत रावसाहेब दानवे तुम्ही जी ४३ वी जागा सांगितली ती बारामती असणार आहे. मागच्या वेळेस ४२ जागा जिंकल्या होत्या. अगामी निवडणुकीत ४३ जागा जिंकू आणि ती ४३ वी जागा बारामतीची असेल, बारामतीमध्ये कमळ फुलवू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मागील निवडणुकीत थोड्या मताने बारामतीमधील जागा गेली. मात्र यंदाच्या निवडणुकीत बारामती मध्ये भाजपची जागा निवडून येणार. शिरुर आणि मावळ मधील जागा भाजप जिंकणार असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, देशात काही जण मुलाचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता सोनिया गांधी यांच्यावर टीका केली.
