महाराष्ट्र

शेतकऱ्यांची समूळ जात नष्ट करण्याचा सरकारचा डाव आहे- धनंजय मुंडे

महासत्ता-  आज शेतकऱ्यांची वाईट स्थिती आहे. एकमेव अशी शेतकऱ्यांची जात आहे. जी निसर्गाच्या सानिध्यात उघड्यावर आपला धंदा करत आहे. शेतकऱ्याची समुळ जात नष्ट करण्याचा डाव सरकारचा आहे. असा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

आज शेतकरी स्वत: च सरण स्वत: रचतोय आणि आपलं जीवन संपवत आहे.  आज मंत्रीमंडळात शेतकऱ्यांचा प्रतिनिधी नसल्याने अशी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांसाठी तिजोरी खुली केली होती परंतु आजचे हे सरकार शेतकरी मेला तरी चालेल अशा भूमिकेत आहे असा आरोपही मुंडे यांनी यावेळी केला.

दरम्यान, २ कोटी नोकऱ्या देणार म्हणून आजची ही तरुणाई ‘हर हर मोदी घर घर मोदी’ म्हणत उड्या मारत होती. परंतु साडेचार वर्षांत नोकरीच्या आमिषाने तरुणाला फसवलं हे लक्षात आल्यावर आज हिच तरुणाई दबक्या आवाजात बोलत आहे साधी सोयरीकही जुळली नाही असे सांगत आहे असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं

Most Popular

To Top