महाराष्ट्र

जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनाची बातमी ऐकल्यावर काय म्हणाले धनंजय मुंडे…

कोल्हापूर- जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनाने देशानं महान संघर्षयोद्धा गमावला आहे. ते हाडाचे कामगारनेते होते. कामगारशक्तीच्या बळावर मुंबईबंद करण्याची क्षमता असलेले ते एकमेव नेते होते. देशातली कामगार चळवळ आज पोरकी झाली आहे. अशा शब्दात विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जॉर्ज फर्नांडिस यांना श्रध्दांजली वाहिली आहे.

केंद्रीय रेल्वेमंत्री, संरक्षणमंत्री म्हणून त्यांनी केलेले कार्य सदैव स्मरणात राहील. जॉर्ज नावाचा झंझावात आता पुन्हा होणार नाही, याचं दुःख आहे. त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली.

दरम्यान, जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनाची बातमी ऐकल्यावर धनंजय मुंडे भावूक झाले होते.

Most Popular

To Top