कोल्हापूर- विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून भाजप सरकावर हल्ला चढवलाय. त्याच बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या वरही निशाणा साधलाय.
अनिल कपूरच्या नायक या चित्रपटात अमरीश पुरी आणि कल्लु मामाची एक कारस्थानी जोडी आहे. ही दोन पात्र दिसली की कोण आठवतं तुम्हाला? अशी विचारणा करत विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. ते कोल्हापूर मधील शिरोळ येथील परिवर्तन सभेत बोलत होते.
दरम्यान, शिरोळ मध्ये उपस्थित असलेला प्रचंड जनसमुदाय हीच आमच्या कामाची पावती आहे, त्यामुळे परिवर्तन होणारच असा विश्वास धनंजय मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.
